Hibiscus flower Tips: आपल्या बाल्कनीची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारची रोपे लावण्याची आवड अनेकांना असतेच. पण, ऋतु बदलानंतर या रोपांची काळजी घेणंही तितकंच परिश्रमाचं होऊन जातं. झाडांना भरगच्च फुले यावीत, त्यांचा किडीपासून बचाव व्हावा यासाठी आपले अथक प्रयत्न सुरू असतात. तसंच रोजच्या वापरात येणाऱ्या फुलांची आणि त्यांच्या रोपांची आपण अधिक काळजी घेतो.

यातलंच गणपती बाप्पाला आवडणारं लाल रंगाचं फूल म्हणजेच जास्वंद. जास्वंदीचं रोप अनेकांच्या बाल्कनीत असतं. जास्वंदीच्या रोपाला भरगच्च फुलं यावीत आणि फुलांचा रंग गडद व्हावा तसेच कीड, बुरशीपासून बचाव करण्यासाठी आपण घरच्या घरीच एक खत तयार करू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया.

Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती

जास्वंदीच्या झाडाच्या खतासाठी करा ‘या’ दोन वस्तूंचा वापर (Hibiscus Flower Tips)

कांद्याच्या साली

कांद्याच्या साली झाडांना फुलं येण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. कारण यामध्ये पोटॅशियमस फॉस्फरस, सल्फर झिंक, मॅग्नेशियम यांसारखे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे याचा वापर आपण खत म्हणून केला तर झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावर कळ्या आणि फुलेदेखील जास्त प्रमाणात लागतात. त्याचबरोबर झाडावर लागलेल्या कळ्या मोठ्या आकाराच्या होतात. उमललेल्या फुलांचा रंग गडद होण्यासाठी या कांद्याच्या सालीचा चांगला फायदा होतो.

हेही वाचा… Rose Flower Tips: गुलाबाच्या रोपाला पटापट कळ्या येण्यासाठी हळदीचा हा सोपा उपाय करून पाहा; पैसे वाचवणारा जुगाडू VIDEO

कांद्याच्या साली खताचे काम करतात, तसंच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणूनदेखील त्यांचा चांगला फायदा होतो.

onion peels

कृती

१. कांद्याच्या सालीपासून खत तयार करून घेण्यासाठी साली आपल्याला जेवढ्या प्रमाणात हव्यात तेवढ्या घेऊन त्या दोन दिवसांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. दोन दिवसांनंतर या पाण्याचा रंग बदलेला दिसेल, म्हणजेच आपलं हे जे खत आहे ते तयार होईल.

२. या पाण्याचा वापर झाडाला डायरेक्ट न करता, पाण्यामध्ये डायल्यूट करून याचा वापर आपण खत म्हणून झाडाला करायचा आहे.

३. याचा वापर कीटकनाशक म्हणूनदेखील करू शकतो.

४. हे पाणी एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे, जेणेकरून यातील कण स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत.

५. जेव्हा झाडावर या पाण्याचा स्प्रे करायचा असेल तेव्हा मात्र पाण्याचं प्रमाण वाढवून घ्यायचं, म्हणजे एक मग पाणी असेल तेव्हा त्यामध्ये तीन मग साधं पाणी मिक्स करून नंतर त्याचा स्प्रे झाडावर करायचा आहे.

हेही वाचा… Benefits of Walking: दररोज ३ किमी चालण्याचा शरीरावर होतो ‘असा’ परिणाम; जाणून घ्या

लिंबू

कांद्याच्या सालीपासून तयार केलेल्या पाण्यामध्ये लिंबाचा रस टाका. एक लिटर कांद्याचं पाणी असेल तर दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा.

लिंबाचा रस कुंडीतील माती ॲसिडीक करण्याचे काम करते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी या मातीची आवश्यकता असते.

१० ते १२ इंचाची जर एक कुंडी असेल तर त्यासाठी एक मग या खताचा वापर करायचा आहे.