गणपती बाप्पाचे आवडते फुल म्हणून जास्वदांचे फुल त्याला वाहिले जाते. जास्वंद ज्याला हिबिस्कस या नावानेही ओळखले जाते. जास्वंदाच्या फुलांचा चहा किंवा जास्वंदाची पावडरचे आरोग्यासाठी काही फायदे आहेत. तुम्हाला जास्वंदाचा फुल आवडते का? तुमच्या घरासमोरील बागेत किंवा गॅलरीतील कुंड्यामध्ये तुम्ही जास्वंदाचे रोप लावले असे पण त्याला फुले येत नसेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर काळजी करू नका आम्ही त्यासाठी सोपा उपाय सुचवणार आहोत.

अनेकदा जास्वंदाचे रोप सुकून जाते किंवा किड लागते. तसेच जास्वंदाला फुले येतच नाही. तुम्हालाही अशा समस्या जाणवण असेल तर आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो तो वापरून पाहा.

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

जास्वंदीचे रोपाची चांगली वाढ व्हावी यासाठी उपाय करून पाहा

  • जास्वंदाच्या रोपाची वेळोवेळी छाटणी करून घ्या आणि भरपूर सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी रोप ठेवा जेणेकरून त्याची चांगली वाढ होईल.
  • झाडाला कीड लागू नये यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. अर्धा चमचा बेकिंग सोडा एक लीटर पाण्यात टाकून एकत्र करा. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून रोपावर हे पाणी फवारा. हे किटकनाशक म्हणून काम करते त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणूनही वापरू शकता. मातीमध्ये हे पाणी टाकून तुम्ही बुरशीपासून सुटका मिळवू शकता.
  • जास्वंदाच्या रोपाच्या वाढीसाठी नायट्रोजन युक्त खत वापरा. त्यासाठी गांडुळ खत आणि शेण खत एकत्र करून जास्वंदाच्या रोपाच्या मातीमध्ये एकत्र करून घ्या.कोणतेही एक खत टाकले तरी फायदा होईल. कोणत्याही रोपासाठी हे खत वापरू शकता. त्यानंतर रोपामध्ये थोडे पाणी टाका.

हेही वाचा – Kitchen Jugaad : रात्री झोपण्यापूर्वी झाडूवर हळद टाका….मोठ्या समस्येतून होईल सुटका; जाणून घ्या भन्नाट ट्रिक

जास्वंदाच्या रोपाला येतील भरपूर कळ्या आणि फुले; हे खत वापरून पाहा

  • जास्वंदाच्या रोपाला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी तुम्ही केळी आणि गुळ वापरून तयार केलेले खत वापरू शकता.
  • केळ आणि गुळ समप्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात पाणी आजिबात टाकू नका.
  • दहा दिवस हे मिश्रण सावलीमध्ये ठेवा त्यानंतर हे खत तयार होईल.
  • गुळ आणि केळीच्या खताचा एक चमचा एक लीटर पाण्यात टाका. खताचा वापर कमी करा. जास्वंदाच्या रोपामध्ये हे खत टाकण्याआधी मुळांन धक्का न लावता कुंडीतील माती मोकळी करून घ्या. त्यानंतर त्यात रोपाला खत टाका.
  • छोटी कुंडी असेल तर एक मग खताचे पाणी वापरा मोठी कुंडी असेल तर दोन मग खताचे पाणी वापरा. काही दिवसांमध्ये तुमचे रोप जास्वंदाच्या कळ्या आणि फुलांनी बहरलेले दिसेल.

हेही वाचा Video : ‘राम आएंगे…’; जर्मन गायिकेने गायले श्री रामाचे भजन! पीएम मोदींनी केले कौतुक, म्हणाले,”सुरेल आवाज…”

युट्युबवर SP GARDENING MARATHI नावाच्या पेजवर हा उपाय सांगितली आहे. हे उपयुक्त आहे का ते स्वत: वापरून पाहा.