पुरूषांच्या तुलनेत महिलांमधील उच्च रक्तदाबाच्या यंत्रणेमध्ये शास्त्रज्ञांना प्रथमच लक्षणीय फरक आढळले आहेत. त्यामुळे महिलांच्या रक्तदाबावरील उपचारांना यापुढे डॉक्टरांना प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे अमेरिका स्थित वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी म्हटले आहे.
महिला व पुरूषांमध्ये असलेला उच्चरक्तदाब समान असल्याचा वैद्यक समुदायाचा अद्याप समज होता. मात्र, या संशोधनामुळे उपचारपध्दतीमध्ये फरक करणे गरजेचे असल्याचे या संशोधनावर काम करणारे प्राध्यापक कार्लोस फेरारीओ यांनी सांगितले.
गेल्या २० ते ३० वर्षांच्या दरम्यान पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होणाऱ्या मृत्युमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, महिलासंबधी हा अनुभव बरोबर उलट आहे.   
या तुलनात्मक अभ्यासामध्ये, उच्च रक्तदाब आणि इतर प्रमुख जुन्या आजारांनी बाधीत असलेल्या व उपचार न केलेल्या १०० पुरुष आणि ५३ महिलांचा सहभाग करण्यात आला होता. या महिला व पुरूषांच्या उच्च रक्तदाबाचे विशेष परीक्षणांच्या साहाय्याने विश्लेषण करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. या संशोधनाच्या माध्यमातून लवकरच नव्या उपचार पध्दतीवर संशोधन करण्याचे मार्ग मोकळे होणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.   

Story img Loader