High cholesterol Symptoms and causes: आजकाल अनेक लोक बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. जंक फूडसह चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि जास्त मद्यपान हे उच्च कोलेस्टेरॉलची महत्त्वाची कारणे आहेत. उच्च कोलेस्टेरॉल हृदयाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. विशेष म्हणजे, बर्याच लोकांना उच्च कोलेस्टेरॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते.

परिणामी, रक्त प्रवाह कमी होतो आणि यामुळे अर्धांगवायू, छातीत दुखणे आणि हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढले असेल तर काही लक्षणांवरून ते ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे लवकर ओळखणे पुढील घातक परिस्थिती टाळू शकते. जर तुम्हाला चालताना वेदना होत असल्यास. तर हे देखील आहे उच्च कोलेस्ट्रॉलचे एक लक्षण आहे. जाणून घेऊया त्याबद्दल..

Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chest Pain & Heart Attack
Chest Pain & Heart Attack : छातीत दुखणे हे नेहमी हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असते का? तज्ज्ञ काय सांगतात…
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
Does Eating Ghee Really Make You Fat
Eating Ghee Increases Obesity : तुपाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
Why radish leaves or mulyachi pane deserve a place in your winter diet
हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश का असावा? तज्ज्ञांनी सांगितले कारण…
foamy urine kidney problem
लघवीमधून प्रचंड फेस येतोय? हे कोणत्या आजाराचे लक्षण तर नाही ना? वाचा डॉक्टर काय सांगतात
Can side effects of overusing medication cause heart attack
Heart Attack : औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

( हे ही वाचा: शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होऊ लागल्या वेदना, तर समजून जा कोलेस्ट्रॉल वाढत आहे, जाणून घ्या High Cholesterol ची लक्षणे)

उच्च कोलेस्टेरॉलची पायाची लक्षणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत कोलेस्टेरॉलची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचत नाही तोपर्यंत त्याची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत. या दरम्यान त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो. कोलेस्टेरॉलचे निदान करण्यासाठी नियमित रक्त तपासणी हा एकमेव मार्ग आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा पायांवर परिणाम होतो. हे भविष्यात धोकादायक ठरू शकते.

नखे आणि त्वचेचा रंग

जेव्हा पायात कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते, तेव्हा संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही. यामुळे त्वचेचा आणि नखांचा रंग बदलतो. त्यापैकी काही पिवळे किंवा जांभळे दिसू शकतात.

( हे ही वाचा: भारतात करोनाची चौथी लाट? प्रचंड वेगाने वाढतोय Omicron XBB चा धोका, ‘ही’ गोष्ट तुम्हाला वाचवू शकते)

पाय दुखणे वाढते

जेव्हा पायातील धमन्या ब्लॉक होतात तेव्हा खालच्या भागात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे चालताना जडपणा आणि थकवा जाणवतो. उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या लोकांच्या पायावर सूज येण्याची समस्या देखील असू शकते. या लक्षणांव्यतिरिक्त, उच्च कोलेस्टेरॉलमुळे पाय दुखणे, पायांच्या तळव्यामध्ये कॉलस (अतिरिक्त पाण्याचा स्त्राव) होऊ शकतो. यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

Story img Loader