पौगंडावस्थेत जास्त मेदयुक्त पदार्थ खाण्यामध्ये आल्यास तरूण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे.
आहारातील मेदयुक्त पदार्थांच्या सातत्यामुळे स्तनाचा कर्करोग बळावत असल्याचा दावा अमेरिकेतील मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या(एमएसयू) संशोधकांनी केला आहे.       
स्तनाच्या कर्करोगाची गाठ आढळण्या आधीच्या निदानीय पध्दतीचा उपयोगकरण्यावर या संशोधकांनी भर दिला आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे म्हणजे, स्तनामध्ये बदल जाणवू लागतात. पेशींची अप्रतिबंद वाढ होवून, रोग प्रतिरोधक पेशींमध्ये बदल घडून येतात.     
किशोरवयात होणारे हे बदल टिकून राहतात व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे तरूण वयात दिसण्यास सुरूवात होते.
“तरूण महिलांना या प्रकारचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्याची तिव्रता देखील जास्त असते. त्यामुळे अशाप्रकारचा आजार जडण्यापूर्वीच योग्यती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलींनी पौगंडावस्थेतच मेदयुक्त पदार्थ खाण्यावर मर्यादा घालणे हा उपायच उपयुक्त ठरेल,” असे ‘एमएसयू’च्या ह्यूमन मेडिसिन महाविद्यालयाच्या शरीरशास्त्राच्या प्राध्यापीका सॅण्ड्रा हसलम म्हणाल्या.        

Story img Loader