आयोग्य जीवनशैली आणि गरजेपेक्षा अधिक खाल्ल्याने वजन वाढते. नंतर वजन कमी करण्यासाठी खाण्यावर नियंत्रण आणि व्यायाम करावा लागतो. कॅलरी बर्न कराव्या लागतात. रोज धावणे हा कॅलरी घटवण्यासाठी चांगला पर्याय आहे. मात्र, तुम्हाला नियमित धावणे शक्य नसेल तर तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआऊट करू शकता. काही हाय इंटेन्सिटी व्यायाम वेगाने कॅलरी कमी करण्यात मदत करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) हाय नी रनिंग

हेल्थलनाइनुसार, अर्धा तास हाई नी रनिंग केल्याने २४० ते ३५५ कॅलरी बर्न करता येऊ शकतात. हाय नी रनिंग हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. हा व्यायाम शरीराच्या खालच्या भागाला मजबूत करतो, तसेच हृदय गती वाढवण्यात मदत करतो. हाय नी रनिंग हाई इंटेन्सिटी व्यायाम असल्याने तो खूप कमी वेळात अधिक कॅलरी बर्न करतो. हे करण्यासाठी एका ठिकाणी उभे होऊन धावा आणि गुडघ्याला जितक्या उंच आणू शकता तेवढे आणा, तसेच हातांना देखील वेगाने वर खाली करा.

(फॅटी लिव्हर ‘या’ धोकादायक आजारांना देते आमंत्रण, ‘या’ फळांचे करा सेवन, मिळेल आराम)

२) बट किक

बट किक हे कार्डिओ वर्कआऊट आहे. बट किक अर्धा तास केल्याने २४० ते ३५५ कॅलरी बर्न करता येऊ शकतात. हे हाय नी रनिंग सारखेच आहे. हाय इन्टेन्सिटीवर केल्यास वेगाने कॅलरी कमी करता येऊ शकतात. हा व्यायाम करण्यासाठी एका जागेवर धावा. धावताना पायाचे टाच नितंब जवळ येऊ द्या, असे करताना हातही खाली वरती करा.

3) जंपिंग रोप

जंपिंग रोपमध्ये प्रति मिनीट ७.६ ते ९.८ कॅलरी बर्न होतात. या व्यायामाने हृदयाची गती आणि पायांची ताकद वाढते. कमी कालावधीत अधिक कॅलरी कमी करण्याचा बेत असलेल्यांसाठी हा व्यायाम चांगला पर्याय आहे. १०० ते १२० जंप केल्याने १२ कॅलरी बर्न होतात. १५ ते २० मिनिटे सतत जंपिंग रोप केल्याने जवळपास २०० ते ३०० कॅलरी बर्न होऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे व्यायाम करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)