Weight loss Diet: आजच्या काळात बरेच लोक लठ्ठपणाच्या समस्येतून जात आहेत. तसं तर वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असले तरी प्रत्येकाकडे व्यायामासाठी पुरेसा वेळ नाहीये. अशा परिस्थितीत आहारात काही बदल करूनही आपण स्वत:ला मेंटेन राखू शकतो. कमी कार्बोहायड्रेट, उच्च प्रथिने आणि फायबरयुक्त आहार केवळ वजन कमी करण्यास उपयुक्त नाही तर रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात ठेवू शकते. परिणामी, तुमचे शरीर जास्त प्रमाणात ग्लुकागन हार्मोन तयार करते, जे चरबी जाळण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया या पौष्टिक पदार्थांबद्दल…
- चणे
वजन कमी करण्यासाठी फायबर महत्वाची भूमिका पार पाडते. काळ्या चण्यात फायबर जास्त प्रमाणात असते. सोबतच यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असते. चण्यात फायबर असल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे खुप वेळ भूक जाणवत नाही. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. वजन नियंत्रणात राहते. शिवाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
आणखी वाचा : Ayurvedic Diabetic tips: मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हे’ चूर्ण ठरतील फायदेशीर; आजपासूनच करा सेवन
- दही
दह्यात प्रो-बायोटिक्स असतात जे पचन सुधारण्याचसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. दह्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते आणि ते बॉडी मास इंडेक्सवर (BMI) लक्ष ठेवते. आहारात दह्याचा समावेश करून काही किलो वजन कमी करता येते. एवढेच नाही तर दही ताक, लस्सी देखील वजन कमी करण्यास मदत करतात.
- सूर्यफूल बिया
सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते आणि परिणामी चयापचय वाढते, शरीरासाठी ते फायदेशीर असते. सूर्यफूलाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, त्याचा हृदयासाठी नाही तर आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासही फायदा होतो. या दोन्हीचा परिणाम म्हणजे आपले वजन कमी होते आणि लठ्ठपणाच्या समस्यांपासून आपण वाचतो.