खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींपासून तसंच बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढणे हा काही आजार नसून हे एक प्रकारचे हार्मोनल असंतुलन आहे. असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीरातील युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया आयुर्वेदात सांगितले असे उपाय ज्यामुळे तुमची युरिक ऍसिडची पातळी नियंत्रणात ठेवता येईल.

युरिक ऍसिड म्हणजे काय? What Is Uric Acid

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुडगाव येथील नेफ्रोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण संघाचे संचालक आणि वरिष्ठ डॉ. सलील जैन सांगतात की, आपले युरिन जे युरिक ऍसिडपासून बनलेले असते. त्यामुळे जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा शरीरातून युरिक अॅसिडही बाहेर पडतं. लघवी हा प्रथिनांचा एक प्रकार आहे जो तुटून यूरिक ऍसिड बनते.

nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Nutritionist shares 5 tips to follow for good gut health know Experts opinion
“रोज आवळा खा अन् ताक प्या अन् आतड्यांचे आरोग्य सुधारा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ खरंच उपयुक्त आहेत का?
Heart disease risk , non vegetarian , health care,
हृदयरोगाचा धोका कमी करायचाय? मग, मांसाहार करणाऱ्यांनी…
Can side effects of overusing medication cause heart attack
Heart Attack : औषधांचे अतिसेवन केल्याने हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
benefits of ghee
तूप खा आणि या रोगांना दूर ठेवा

( हे ही वाचा: Uric Acid च्या रुग्णांनी ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, यूरिक अॅसिडची पातळी झपाटयाने होईल कमी)

हे प्रोटीन मांस आणि मशरूमसारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्याच वेळी, जेव्हा शरीर जास्त प्रमाणात यूरिक ऍसिड तयार करू लागते तेव्हा ते रक्तामध्ये समाविष्ट होते. त्यामुळे शरीरातील पेशींना नुकसान होऊ शकते. त्यामुळे वाढत्या युरिक अॅसिडवर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

उच्च यूरिक ऍसिडच्या समस्यांमुळे हे आरोग्य धोके होऊ शकतात ( High Uric Acid Problem)

  • किडनीच्या संबंधित समस्या
  • हाडांच्या समस्या आणि सांधेदुखी
  • हृदयसंबंधित समस्या
  • रक्तदाब
  • मधुमेह

हेल्थ कोच आणि न्यूट्रिशनिस्ट नेहा रंगलानी यांनी शरीरातील वाढत्या युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. ते जाणून घेऊया..

( हे ही वाचा: ‘या’ महिलांना असतो Breast Cancer चा सर्वाधिक धोका, जाणून घ्या कोणत्या वयात केली पाहिजे Test)

हे ६ पदार्थ तुमच्या लिव्हरला मजबूत करून यूरिक ऍसिड नियंत्रित करतात (High Uric Acid Prevention)

ओवा

ओवा आणि ओव्याचे पाणी युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला यूरिक ऍसिड वाढले असेल तर त्यांनी नियमितपणे सकाळी उपाशीपोटी किंवा जेवण केल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक ग्लास ओव्याचे पाणी प्यावे.

हळद

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, कर्क्यूमिन आणि पॉलिफेनॉल असतात. यासोबतच यातील दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. यासोबतच रक्तदाब संतुलित ठेवण्यासही मदत होते.

( हे ही वाचा: तुम्हालाही चालताना वेदना जाणवतायत का? असू शकतं कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण, इतर गंभीर लक्षणेही जाणून घ्या)

लिंबू

लिंबाचा रस शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट बाहेर टाकण्यास मदत करतो. यामध्ये, ते पाणी आणि इतर प्रकारच्या कंपाउंडमध्ये यूरिक ऍसिड तोडते. त्यामुळे रक्तात अ‍ॅसिडचे प्रमाण फारच कमी राहते आणि त्यामुळे शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

बेरीज

बेरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यासोबतच शरीरातील वाढत्या यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यात मदत होते. त्याच वेळी, यामध्ये असलेले गुणधर्म तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.

( हे ही वाचा: Uric Acid: यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी चहाचे सेवन चांगले की कॉफीचे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

ब्रोकोली

ब्रोकोली शरीरातील यूरिक ऍसिडचे प्रमाण संतुलित करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी ओळखली जाते. त्यात व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असते, जे यूरिक ऍसिडच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पोषक आहे.

ग्रीन टी

ग्रीन टीच्या सेवनाने युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते. त्याच वेळी, त्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील यूरिक ऍसिड कमी करते.

Story img Loader