Types of jaggery: हल्ली अनेक जण आहारामध्ये गुळाचा मोठ्या वापर करताना दिसतात. भारतामध्ये अनेक शतकांनंतर गुळाचे महत्त्व सांगणारे विविध खाद्यपदार्थांचे ब्रॅण्ड्स आणि विविध पेये, ज्यात गुळाचा चहा, कॉफी, गुळावर आधारित गरम कोको आणि गुळाचे कार्मेल कस्टर्ड हे मेनूमध्ये सहभागी करण्यात आले आहेत. मात्र, लोक केवळ गुळाच्या कथित आरोग्यदायी फायद्यांसाठी या पदार्थांकडे आकर्षित होत नाहीत, तर त्यामागे गुळाची स्वतःची खास चवदेखील अनेकांना गुळाचे सेवन करण्यासाठी आकर्षित करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालमध्ये तुम्हाला हिवाळ्यात मिठाईच्या दुकानांमध्ये आणि बाजारपेठेत गोड पदार्थांच्या द्रवरूप सोनेरी गुळाचे छोटे कलश दिसतील, ज्याला झोला किंवा नोलेन गूळ आणि गडद तपकिरी गुळाला पाटली गूळ म्हणतात. पाटली गूळ हे खजुराच्या गुळाचे दुसरे नाव आहे. तुम्ही द्रवरूप गूळ फुगलेल्या पोळीवर ओतून खाऊ शकता किंवा तांदळाची खीर बनवण्यासाठी वापरू शकता किंवा साखरेऐवजी टोमॅटो चटणीचा स्वाद घेण्यासाठी वापरू शकता.

गुळाचे अनेक स्रोत

संस्कृतमध्ये गुळाला गुडा आणि हिंदीमध्ये गुर, असे म्हणतात. आयुर्वेदातील प्रभावशाली व्यक्ती आचार्य चरक यांच्या मते, गुडा हा शब्द गौडा या प्राचीन नावावरून आला आहे, हा शब्द म्हणजे बंगालमधील ऊस उत्पादक प्रदेशाचे एक प्रमुख नाव आहे. आयुर्वेद गुळाला ‘गरम अन्न’ मानतो, जो गूळ शुद्ध केल्यामुळे ‘थंड’ आणि कमी पचण्याजोगा होतो. गूळ केवळ उसापासून बनवला जात नाही. दक्षिण भारतात तो पाल्मीरा पामच्या रसापासून बनवला जातो. या रसाची आंबण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी चुन्याने मळलेल्या भांड्यांमध्ये तो रस गोळा केला जातो आणि नंतर तो घट्ट होईपर्यंत उकळला जातो. बंगालमध्ये जंगली खजुराचा रस नारळाच्या करटीच्या / कवचाच्या अर्ध्या भागात ठेवला जातो, जेणेकरून ते पाटली गुळात परावर्तित होईल.

कलकत्त्यातील नोलेन गूळ फक्त हिवाळ्यातच दिसतो. कारण- खजुराचे झाड केवळ थंड तापमानात रस तयार करते, ज्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत गुळ उपलब्ध होतो. काढलेला रस हळूहळू मंद आचेवर चिकट होईपर्यंत उकळला जातो. स्फटिकीकरण करण्यापूर्वी थांबवल्यास, तो द्रव स्वरूपात गूळ म्हणून राहतो, जो सीलबंद बरणीत सहा महिने टिकू शकतो. आणखी घट्ट झाल्यास ‘पाटली गूळ’ तयार होतो. गडद तपकिरी घन पदार्थ असलेला हा ‘पाटली गूळ’ तोंडात वितळतो. एक वर्षापेक्षा जास्त काळ हा गूळ टिकवता येतो.

इ.स.पूर्व चौथ्या शतकापासून गुळाचे उत्पादन केले जात आहे. पुंड्रा बर्धन (आता बोगरा, बंगाल) येथे शिउली समुदाय रात्रीच्या वेळी खजुराच्या झाडावर चढून रस काढत असे, जो बाजारात विकला जात असे. या व्यापारामुळे या प्रदेशाला पुंड्रा बर्धनला गौर (गुर) असे नाव पडले. गुळाला धार्मिक महत्त्वही आहे. बंगाली मिठाईची दुकाने पारंपरिकपणे नोलेन गूळ मिष्टी किंवा संघेशाचा पहिला तुकडा देवी कालीला अर्पण करतात.

भारत जगभरातील ७० टक्क्यांहून अधिक गुळाचे उत्पादन करतो; परंतु यातील बराचसा भाग उसाच्या गुळापासून तयार होतो. गूळ इ.स.पू. ६००० च्या सुमारास मलायन द्वीपकल्प आणि बर्मामार्गे भारतीय उपखंडात आला. या देशांमधील अनेक करी व सॅलडमध्ये गूळ हा मुख्य चवदार घटकांपैकी एक आहे. उसापासून बनवलेला गूळ आणि ज्याला गुड म्हणतात, तो पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहे. पाकिस्तानच्या काही भागांत पामरायह पाम, नारळ पाम किंवा खजुराच्या झाडांपासून गूळ तयार केला जातो आणि घट्ट द्रव साच्यात एकत्र करून, तयार झालेला गूळ विकला जातो.

जागतिक पदार्थांमध्ये गूळ

पाकिस्तानच्या थंड भागात गुळाचा चहा इतका सामान्य आहे की, सामान्य साखरेचा चहा मिळणे जवळजवळ अशक्य आहे.

दक्षिण आशियामध्ये तुम्हाला कोलंबिया आणि कॅरेबियनच्या बऱ्याच भागात पॅनेला आढळते. जपानमध्ये गुळाला कोकुटो आणि ब्राझीलमध्ये रापादुरा म्हणतात. अनेक थाई, मलेशियन व बर्मी पदार्थांमध्ये गोडवा आणण्यासाठी चुरा केलेला गूळ वापरला जातो.

बंगाली मिठाईच्या दुकानात गुळाचा रसगोल्ला किंवा गुरू संधेश किंवा गुरेर पाशेश हे पदार्थ बनवले जातात.