एका नवीन परीक्षणाच्या संशोधकांनी दावा केला आहे की, भारतातील एक अरबपेक्षाही जास्त असलेल्या लोकसंख्येचे दर पाच वर्षांमध्ये एचआयव्ही परीक्षण केल्यास लाखो प्राण वाचू शकतात. तसेच, यामुळे आर्थिकदृष्ट्या या महामारीचे व्यवस्थापन केले जाऊ शकते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. हा दावा करणा-या संशोधकांमध्ये भारतीय संशोधकाचाही समावेश आहे.
प्रचंड लोकसंख्या असणा-या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचे परीक्षण केल्यास लाखो जीव वाचू शकतात. ‘‘कॉस्ट इफिकेक्टिवनेस ऑफ प्रिवेन्टिग कॉम्प्लीकेशन्स’’ (सीईपीएसी) च्या वापराने करण्यात आलेल्या भारतातील एचआयव्हीच्या काळजीपूर्वक विश्लेषणावर हे तथ्य आधारित आहे. फ्रांस, दक्षिण आफ्रीका आणि अन्य देशांमध्ये एचआयवी नीती तयार करण्यासाठी या धोरणाचा उपयोग करण्यात येत आहे.
या परिक्षणाशी संबंधित डॉ.सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, या धोरणामुळे देशाला महामारीपासून लढण्याची ताकद मिळेल. एचआयव्ही प्रतिबंध कार्य, शून्य संक्रमण ध्येय आणि चाचणी विस्तारामध्ये भारत पुढे आल्यास धोरणकर्त्यांना सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत होईल.