अनेकदा कामात व्यस्त असल्याने आपण खाणे-पिणे विसरतोच, पण लघवीला जाणेही टाळतो. अनेक वेळा असे घडते की, आपण दिर्घकाळापासून मिटिंगमध्ये असतो किंवा लांबच्या प्रवासाला जातो, अशा स्थितीत लघवी रोखून ठेवतो. तुम्हाला माहिती आहे की लघवी नियंत्रित करून तुम्ही तुमच्या शरीरातील नैसर्गिक कार्यात अडथळा आणत आहात, ज्यामुळे तुमच्या शरीराला हानी होऊ शकते. काहीवेळा काही समस्या किंवा कारणामुळे लघवीवर नियंत्रण ठेवणे काही चिंतेचे कारण नाही, परंतु नियमितपणे असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. नियमित लघवीवर रोखून ठेवणे लघवीशी संबंधित अनेक समस्या वाढवू शकते.
मीरा रोडवरील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या एंड्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन, यूरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. आशुतोष बघेल यांनी द इंडियन “एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की,” तुम्ही तुमच्या मूत्राशयाची एखाद्या फुग्याप्रमाणे कल्पना करू शकता. मूत्राशय लघवीने भरताच ते तुमच्या मेंदूला ते रिकामे करण्याचा संकेत देते. “
जर तुम्ही रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला, तर लघवीचे प्रमाण वाढत राहते, मुत्राशयाववर दबाव पडतो. या दाबामुळे मूत्राशयाचा फुग्यासारखा आकार वाढतो. फुगा जास्त फुगल्यामुळे तो फुटू शकतो. त्याचप्रमाणे मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवीमुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. लघवी थांबल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया तज्ञांकडून.
हेही वाचा –मिलेट्स दूध म्हणजे काय? रोजच्या आहारात सेवन करू शकता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे
UTI चा धोका वाढू शकतो
न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी इंस्टाग्रामवर सांगितले आहे की, लघवी जास्त वेळ रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे यूटीआय किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. एवढेच नाही तर लघवीवर नियंत्रण ठेवल्याने मूत्राशयाच्या आजाराचा धोकाही वाढू शकतो. लघवीला जास्त वेळ दाबून ठेवल्याने लघवीतील बॅक्टेरियांची संख्या वाढते जे मूत्राशयाच्या आत पोहोचतात आणि संसर्गास कारणीभूत ठरतात. जर तुम्हाला यूटीआय टाळायचे असेल तर, दाब असल्यास लगेच लघवी करा
लघवी गळतीची समस्या वाढू शकते
मूत्राशय एक स्नायू आहे. नियमितपणे मूत्राशय रिकामे करण्याच्या संदेशांकडे दुर्लक्ष केल्याने हे स्नायू कमकुवत होतात. जर तुम्ही नियमितपणे लघवी रोखून ठेवली तर पेल्विक फ्लोअर कमकुवत होते आणि लघवी गळतीची समस्या वाढते. कधीकधी मूत्राशयाचा विस्तार होऊ शकतो ज्यामुळे मूत्राशयाचे नुकसान होऊ शकते.
हेही वाचा – Sunscreen vs. Sunblock: सनस्क्रीन आणि सनब्लॉकमध्ये काय आहे फरक? तुमच्या त्वचेसाठी कोणते आहे चांगले?
नैसर्गिक मूत्र स्त्राव प्रभावित करते
जर तुम्ही लघवी बराच काळ रोखून ठेवली तर तुम्हाला लघवी करण्याचे संकेत समजू शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या शरीराच्या सिग्नलचा चुकीचा अर्थ लावू शकाल. तज्ञांनी सांगितले की, तुम्हाला लघवी सोडण्याची तीव्र इच्छा जाणवत नसली तरीही तुम्ही बाथरूममध्ये जाता. लघवी धरून ठेवण्याच्या सवयीमुळे तुमची नैसर्गिक लघवी डिस्चार्ज सिस्टम खराब होते.
मूत्रपिंडावर देखील परिणाम होऊ शकतो
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढू शकतो. लघवी थांबवल्याने किडनीवर दबाव पडतो ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते. लघवी थांबवल्याने युरिक ॲसिड वाढण्याची समस्या वाढण्याचा धोका असतो.