वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. मराठी वर्षातील हा अखेरचा सण. होळीनंतर १२ दिवसांनी गुढी पाडव्याला मराठी नववर्षाची सुरूवात होते. देशभरात होळीचा सण विवध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळी पूजन केले जाते. होळी पुजनाला आपल्याकडे शिमगा असेही म्हणतात. होली दहनानंतर पाचव्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यास्तानंतर होलिका प्रज्वलित करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या वर्षी होलिका दहन सोमवारी ०९ मार्च रोजी आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार होळी पेटविण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी २ तास २६ मिनिटांचा आहे. संध्याकाळी ६.२७ ते रात्री ८.५३ वाजतापर्यंत होळी पेटविण्यासाठी शूभमुहूर्त आहे. सोमवारी पहाटे ३.०३ वाजतापासून फाल्गुन पौर्णिमेस प्रारंभ होईल आणि रात्री ११.१८ वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. मंगळवार (१० मार्च) हा दिवस धूळवड म्हणून साजरा केला जाणार आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन पंचमी अर्थात शुक्रवार १३ मार्चपर्यंत हा सण साजरा केला जातो.

सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. ही एक प्रकारची अग्निपूजाच आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक होळी साजरी करताना झाडांची छाटणी करण्यापेक्षा पानगळ झालेली पानं, काट्या कुट्या एकत्र करून होळी साजरी करणं हितावह आहे. होळीची शास्त्रोत्र पूजा करून ती पेटवली जाते. त्याभोवती फिरून बोंबा मारल्या जातात. दुष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, याउद्देशाने शिमगा साजरा केला जातो. होळीनिमित्त घरोघरी पूरणपोळीचा नैवेद्य केला जातो.

रंग खेळताना डोळ्यांसाठी धोकादायक

रंगातील चमकणारे पदार्थ डोळ्यात गेल्यास बुब्बुळ जखमी होऊ शकतो
रंगाचे फुगे डोळ्यावर लागल्यास जखम होऊ शकते
लेन्स लागलेल्या बुब्बुळावर फुगे लागल्यास ते सरकू शकते
रंगात दूषित पाणी वापरल्यास त्यामुळे डोळ्यात जंतू पसरू शकतात
ओल्या फरशीवरून पडल्यास डोळ्याला इजा होऊ शकते
घ्यायची काळजी

रासायनिक रंगाचा प्रयोग टाळावा
डोळ्याला इजा झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या
डोळ्याच्या शेजारी रंग लागल्यास ते काढण्याकरिता क्रिमचा वापर करा
चष्मा वा गॉगल लावून होळी खेळा
होळीत डिस्पोसेबल कॉन्टेक्ट लेन्स घाला
प्रवास करताना रेल्वे, बस वा चारचाकीचे काच बंद ठेवा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi 2020 holi date time significance shubh muhurat and celebrations nck