Holi/ Rangpanchmi 2022: रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा हा सण आहे. आजचा दिवस आहे तो बाकीचं सगळं विसरत मनमोकळेपणाने होळीच्या शुभेच्छा देण्याचा. यादिवशी आपलं दु:ख विसरत एकत्र येत सगळेजण हा सण साजरा करतात. पण प्रत्येकवेळी आपल्याला आपल्या प्रियव्यक्तींना भेटणं शक्य होत नाही. मग त्यावेळेस आपण मेसेजच्या माध्यमातून आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवतो. तर आजच्या या सणानिमित्त पाठवायच्या मेसेजेस् ची काही सजेशन्स..
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी रंगपंचमी !
(हे ही वाचा: Happy Holi Marathi Message: होळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा मेसेज!)

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
(हे ही वाचा: Holika Dahan 2022: राशीनुसार होळीमध्ये करा ‘या’ गोष्टी अर्पण, होऊ शकतो धनलाभ!)

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
(हे ही वाचा: Hoil 2022: यंदा कधी साजरी होणार होळी? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त)

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
(हे ही वाचा: Holi 2022: होळी का पेटवली जाते? जाणून घ्या कारण)

रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी…
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
(शुभेच्छापत्र: https://www.loksatta.com/holi-greetings/)

साथ रंगांची, उधळण आनंदाची…
धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा!!
नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
(क्रेडीट: सोशल मीडिया)