होळीला रंगांचा सण म्हटले जाते, देशभरात होळी सणानिमित्त जोरदार तयारी सुरु झाली आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा साजरा केला जातो अनेक ठिकाणी तर होळीचे पारंपारिक रितीरिवाज सुरुही झाले. यंदा हा सण ८ मार्च रोजी साजरा होणार आहे. या सणानिमित्त तुम्हीही मित्र- मैत्रिणी, कुटुंबियांसोबत होळी खेळण्याचे प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली असेल. पण दिवशी तुम्हाला इतरांपेक्षा स्टायलिश आणि फॅशनेबल लूक कॅरी करण्याची इच्छा असेल, तर आम्ही तुम्हाला अशा काही खास फॅशन टिप्स सांगणार आहोत ज्या कॅरी करून तुम्ही सर्वांच्या नजरा स्वत:वर खिळवून ठेवू शकता. होळी हा रंगांचा सण असल्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही योग्य कपडे कॅरी उत्सवाचा आनंद लूटू शकता.
सैल आणि कम्फर्टेबल कपडे घाला.
होळीला रंग खेळताना जास्त स्टायलिस्ट कपडे घालू नका. त्याऐवजी तुम्ही कम्फर्टेबल वाटतील असे कपडे घाला. ट्रान्सपरंट आणि खूप सैल कपडे घालणं टाळा, यामुळे तुम्हाला रंग खेळताना अवघडल्या सारखं वाटेल, त्याऐवजी गडद रंगाचे आणि थोडे जाड कपडे परिधान करा. यात तुम्ही आवडत्या रंगाचा कुर्ता लेहेंगा किंवा लेगिन्स असा एक नेहमीचा लूक देखील कॅरी करु शकता, याशिवाय रंगबेरंगी टिशर्ट, जीन्स देखील कॅरी करू शकता.
शक्यतो कॉटनचे कपडे निवडा.
होळीच्या स्टाईल स्टेटमेंटसोबत तुम्ही जे काही परिधान करता त्याच्या फॅब्रिककडेही लक्ष द्या. होळीदरम्यान उष्णता वाढते, त्यामुळे सुती कपडे उत्तम. अशा कपड्यांमध्ये तुम्हाला गर्मी जाणवणार नाही. तुम्ही पांढरे कपडे घालावेत असे काही नाही, तुम्ही रंगीबेरंगी कपडे निवडू शकता, पण कपडं कॉटनचं निवडा.
रंगबिरंगा ओढणी, स्कार्फ कॅरी करा.
होळीच्या दिवशी तुम्ही रंगीबेरंगी किंवा गडद रंगाचा स्कार्फ देखील कॅरी करू शकता. पण जरी असलेली ओढणी वापरू नका. तुम्ही स्कार्फने केस देखील झाकून ठेवू शकता, यामुळे केसांच्या मुळांपर्यंत जास्त रंग लागणार नाही. एक प्लेन रंगाचा कुर्ता, लेगिन्स आणि त्यावर रंगीबेरंगी ओढणी घेत तुम्ही एक फेस्टिवल लूक कॅरी करू शकता.