Holi 2024 रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे…लवकरच रंगांची उधळण करत होळी येणार आहे. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ”बुरा न मानो होली है,” म्हणून त्यांच्या अंगावर कोणी रंग टाकून जातोच. चेहरा, त्वचा, केस खराब होतील याचा विचार करून तुम्हीही त्या व्यक्तीला अडवता का? स्वतःची इच्छा असूनही फक्त त्वचेची काळजी तुम्हाला आनंद साजरा करण्यापासून थांबवतेय का? तर असे करण्याची काहीच गरज नाही, आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील होळीच्या रंगापासून सुटका मिळवू शकता. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. यासाठी तुमच्यासाठी काही खास टिप्स…

बेसन, लिंबू आणि दूध
बेसन, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करा. रंग असलेल्या त्वचेवर ही पेस्ट लावा. १५-२० मिनीट ती पेस्ट सुकू द्या आणि सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ करा. त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.

kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What To Eat To Beat Hormonal Acne? Experts Share Tips And Foods To Eat
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, तर काय खावे आणि काय खाऊ नये? वाचा अन् पिंपल्स कायमचे दूर करा
Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
Protect yourself from HMPV : How to choose the right mask
HMPV चा धोका टाळण्यासाठी अन् सुरक्षित राहण्यासाठी कोणता मास्क वापरावा, जाणून घ्या तुमच्यासाठी योग्य मास्क कोणता?
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
What is water intoxication
Water Intoxication : त्वचा चमकदार दिसण्यासाठी खूप पाणी पिताय? मग थांबा! ‘या’ समस्येला तुम्हालाही द्यावे लागेल तोंड; डॉक्टर म्हणतात…
Tea that will solve problem of pimples hairfall dark spots skin tea but know this expert advice
चहा ठरेल पिंपल्स, केसगळती आणि काळे डाग घालवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! कॉन्टेन्ट क्रिएटरच्या ‘या’ रेसिपीवर तज्ज्ञ म्हणाले…

काकडीचा रस
होळीचे रंग काढण्याचा हा सर्वात परिणामकारक उपाय आहे. काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमचा साईडर व्हिनेगर घालून मिश्रण तयार करा. रंग असलेल्या त्वचेवर ते लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे रंग गायब होऊन त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.

मुळ्याचा रस
होळीचे रंग काढण्यासाठी मुळ्याचा रस अतिशय फायदेशीर आहे. त्यासाठी मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिसळा. त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे रंग निघण्याबरोबरच त्वचा मॉईश्चराईज होईल.

दुधात कच्च्या पपईचा गर
होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही हा उपायही करू शकता. यासाठी दुधात कच्च्या पपईचा गर घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घालून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहार स्वच्छ करा.

हेही वाचा >> Holi 2024: होळी आली रे… तत्पूर्वी केसांची आणि त्वचेची अशी घ्या काळजी; फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

कपड्यांचा रंग कसा स्वच्छ कराल?

ब्लीचने करा साफ

जर तुमच्या पांढऱ्या कपड्यांवर रंग लागला असेल तर त्यातील रंग काढणे थोडे कठीण आहे. पांढरे कपडे खूप लवकर रंग शोषून घेतात. जर तुम्हाला पांढऱ्या कपड्यांवरून रंग काढायचा असेल, तर अर्धा कप कोमट पाण्यात नॉन-क्लोरीन ब्लीच घाला आणि मग त्यात तुमचे पांढरे कपडे घाला. काही वेळ भिजवून ठेवल्यानंतर ते साधारणपणे धुवा आणि कोरडे करा. पांढऱ्या कपड्यांवरील रंग कमी होईल

लिंबाच्या रसाने स्वच्छ करा

लिंबाचा अम्लीय गुणधर्म डाग काढून टाकण्यास मदत करतो. एका भांड्यात डिटर्जंट आणि लिंबाचा रस (लिंबाचा रस कसा साठवायचा) घालून घट्ट पेस्ट बनवा आणि नंतर डागांवर लावा आणि सुमारे १५ मिनिटे ठेवा. १५ मिनिटांनंतर, हलक्या हातांनी स्क्रब करा आणि सामान्य पद्धतीने धुवा.

Story img Loader