Skin Care Tips Holi 2024: रंगांचा सण होळी, कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत अतिशय उत्साहात साजरा केला जातो. स्वादिष्ट मिठाई, आकर्षक रंग आणि पाण्याची फुग्यांची मौजमजा अशी रेलचेल घेऊन होळी लवकरच येतेय. पण काही लोक विशेषतः मुलींना त्यांच्या त्वचेची जास्त काळजी असते. होळीला चेहऱ्यावर रंग लावल्यामुळे अनेक वेळा अॅलर्जी आणि लालसरपणा येतो. रंगांमध्ये असलेले केमिकल्स त्वचेसाठीच नव्हे तर केसांसाठीही हानिकारक असतात. या सणासुदीच्या काळात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे होळी खेळताना त्वचेला इजा होण्याची भीती राहणार नाही.
बदाम तेल
बदामाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. होळी खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला बदामाचे तेल लावू शकता. बदामाचे तेल हे व्हिटॅमिन ईचा समृद्ध स्रोत आहे. हे तेल त्वचेवर संरक्षणात्मक थर बनवते जेणेकरून रंग त्वचेला हानी पोहोचवू शकत नाहीत. याशिवाय होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि शरीरावर बदामाचे तेल लावल्यास रंग त्वचेला चिकटत नाही.
नारळाचं तेल
बदामाच्या तेलाप्रमाणे नारळाचे तेलही त्वचेसाठी चांगले असते. होळी खेळण्यापूर्वी खोबरेल तेल नीट लावा. हे तेल त्वचेवर तसेच केसांना लावता येते. त्यामुळे केसांनाही इजा होत नाही.
सनस्क्रीन
होळी खेळताना आपण बाहेर उन्हात असतो. यामुळे सन टॅनिंगही वाढते. अशा स्थितीत चेहरा आणि शरीरावर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. वॉटरप्रूफ सनस्क्रीन त्वचेवर लावल्यास त्वचेला रंगांपासूनही संरक्षण मिळते. विशेषतः ऑफिसमध्ये होळी खेळणाऱ्या लोकांनी सनस्क्रीन लावूनच होळी खेळावी.
टोनर लावा
होळीला काही दिवस असले तरी आजपासूनच चेहऱ्यावर टोनर लावायला सुरुवात करावी. टोनर लावल्याने त्वचेची मोठी छिद्रे लहान होऊ लागतात. त्यामुळे त्वचा रंग लवकर शोषून घेत नाहीत आणि डेड स्किनही चेहऱ्यावर कमी जमा होते.
हेही वाचा >> Glowing Skin: ग्लोईंग चेहऱ्यासाठी घरच्या घरीच तयार करा सिरम; नैसर्गिक पदार्थांनी त्वचेवर येईल खास चमक
याशिवाय होळीच्या दिवशी पूर्ण झाकलेले कपडे घाला. तसेच घट्ट कपडे घालणं टाळा. होळी खेळण्यासाठी फक्त नैसर्गिक रंग वापरा. हे रंग सहज काढता येतात.
यंदाच्या होळीत तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्ही होळी मनसोक्तही खेळू शकता आणि तुमच्या त्वचेची काळजी देखील घेऊ शकता. त्यामुळे हे उपाय नक्की करून पाहा. तुम्हाला फरक काही दिवसांतच जाणवू लागेल.