प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com
फॅशन
होळीच्या निमित्ताने हल्ली होळी पार्टीज्चे आयोजन केले जाते. अशावेळी फॅशन पण सांभाळायची असते आणि होळीच्या रंगांचा आनंददेखील घ्यायचा असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
होळी आनंदाचा, उत्साहाचा सण. देशभरात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. कुठे होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात. कुठे होळीनंतरच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी असते. काही ठिकाणी होलिकादहन ते रंगपंचमी अशी पाच दिवस होळी साजरी होते. मनसोक्त रंग खेळणे, खाणंपिणं असा हा सारा माहोल सर्वाना एकत्र येण्यासाठी एक उत्तम कारणदेखील असते. त्यामुळे हल्ली यानिमित्ताने होळी पार्टीदेखील होत असतात. अगदी ऑफिसमध्येदेखील अशा पार्टीज् दिसून येतात. या पार्टीत खाण्यापिण्याबरोबर रंग खेळले जातात. संगीत, नृत्य असा सारा पारंपरिक आणि आधुनिक दोहोंचा मिलाप असतो. अशावेळी आपले कपडे कसे असावेत, कोणती स्टाईल असावी, आपण प्रेझेंटेबल कसे दिसू, लुक हटके असेल का, असे प्रश्न पडतात. होळीच्या निमित्ताने बाजारात कोणते ट्रेण्डस आहेत हे पाहूया.
पारंपरिक पण हटके लुक
होळी पार्टी म्हणजे पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाप असतो. अशा पार्टीमध्ये एलिगंट पारंपरिक कपडे घातलेच पाहिजेत. त्याला तुम्ही व्यवस्थित मेकअप आणि दागिन्यांच्या मदतीने स्टाइल केलंत की सर्वामध्ये उठून दिसाल.
सिम्पल कुर्ती आणि सलसर सलवार अथवा पायजमा छान सुती किंवा शिफॉन कुर्ती आणि त्यासोबत सलवार हा अगदी आत्ताचा ट्रेण्ड आहे. बॉलीवूडमधील नवीन पिढीतील दोन अभिनेत्रींनी हा ट्रेण्ड सेट केला आहे. सारा अली खान आणि जान्हवी कपूर. त्यामुळे हा ट्रेण्ड हल्ली चांगलाच वापरात आहे. हा लुक खूपच आरामदायी आहे आणि तरीही उठावदार दिसणारा आहे. यात बरेचदा मॅचिंग सलवार आणि कुर्ती टीमअप केली जाते. आणि एखादी छान ओढणी या लुकचा सौंदर्य वाढवते.
एखादी सिम्पल कुर्ती घातली की त्याबरोबर लेगिन्स टीमअप केली असेल. हा लुकसुद्धा साधा आणि छान आहे, पण त्यामध्ये एखादा उत्तम दर्जाचा घटक वाढवायचा असेल तर सरळ सलसर सलवार कुर्ती सोबत टीमअप करून बघा. भिन्न रंगांऐवजी त्याला सुसंगत अशी बॉटम वापरा आणि ओढणी मात्र भिन्न रंगाची वापरावी. कुर्तीला साजेशी लिपस्टिक वापरू शकता. तसेच ऑक्सिडाइज दागिने घालून लुकची पूर्तता करता येईल. रस्ट गोल्ड ज्वेलरी खूप छान लुक मिळवून देते.
अनारकली पॅटर्न
नेहमीचाच तोच तोच अनारकली सूट घालून घालून खूप बोअर झाला असाल तर ‘अनारकली विथ पँट्स’ नक्की वापरून बघा. गेल्या एखाद वर्षांतलाचा हा ट्रेण्ड आहे. अत्यंत उत्तम दर्जाची आणि साध्या पद्धतीने डिझायनर्सनी ही संकल्पना रॅम्पवर उतरवली होती. यामध्ये नेहमीच्या अनारकलीप्रमाणेच घेरदार कुर्ती असते आणि अरुंद पॅण्ट्सबरोबर टीमअप केली जाते. वर एखादा सुंदर दुपट्टा घालून हा लुक तयार होतो. या नॅरो बॉटम पॅन्टऐवजी अनारकलीसोबत पलाझो पॅन्ट्ससुद्धा टीमअप केली जाते. काही वेळा अनारकलीसोबत घागरासुद्धा घातला जातो. खूप सुंदर लुक या सगळ्यातून मिळवता येतो. हायएन्ड होळी पार्टीजमध्ये तुम्ही हे प्रकार नक्की वापरू शकता; पण यात काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अतिभडक रंग आणि खूप जास्त नक्षीकाम टाळावं. त्याऐवजी पांढऱ्या, हलक्या रंगाच्या छटा वापराव्यात. कापडदेखील सुती, खादी असल्यास उत्तम. दुपट्टा मात्र हेवी असेल तरीही चालेल. मोठी टिकली आणि सुंदर दागिने घालून तुमचा लुक तयार होईल.
घरारा
हल्ली पारंपरिक कपडय़ांमध्ये घराराचा ट्रेण्ड जोरात आहे. घरारा म्हणजे नेमकं काय? घरारा म्हणजे एक लहान किंवा मध्यम लांबीचा कुर्ता. गुडघ्यापर्यंत घट्ट पायजमा आणि मग त्याला घेरदार बनवलं जातं. सोबत सुंदर ओढणी असते. गुडघ्याला सुंदर नक्षीकाम केलं जातं, जेणेकरून घेर वेगळा ओळखू येईल. खूप पूर्वीपासून भारतात घरारा वापरला जात होता. लखनवी मुस्लीम स्त्रिया घरारा वापरत. मध्यंतरी ही पद्धत वापरात नव्हती. आता पुन्हा एकदा तो ट्रेंड इन झाला आहे. केदारनाथ सिनेमामध्ये घरारा वापरला गेला. घेरदार सलवार अनारकलीसोबतसुद्धा वापरली जाते. होळी पार्टीजसाठी हलक्या रंगांचा घरारा खूप सुंदर दिसेल. हा अतिशय सुटसुटीत असा पोशाख आहे. यामुळे इतरांमध्ये नक्कीच उठून दिसाल.
साडी
भारतीय पारंपरिक कपडे साडीशिवाय अपूर्ण आहेत. होळी पार्टीजच्या निमित्ताने तुम्ही नक्कीच साडी नेसू शकता. आता साडीमध्ये काय वेगळं आहे, असा प्रश्न पडू शकतो, तर साडीमध्ये काहीच वेगळं नाही; पण तुम्ही ब्लाऊजमध्ये वेगवेगळे बदल करू शकता. सध्या वेगवेगळे क्लासी ब्लाऊज बाजारात उपलब्ध आहेत. एखादी सुंदर सुती साडी आणि त्यासोबत नूडल स्ट्रॅप ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल. घेरदार हाताचं ब्लाऊजसुद्धा तुमच्या साध्या सुती साडीला एक वेगळा लुक मिळवून देईल. एखादा क्लासी सुती शर्टसुद्धा तुम्ही ब्लाऊज म्हणून वापरू शकता किंवा एखादा कुर्तासुद्धा तुम्ही साडीवर टीमअप करू शकता. असे अनेक ब्लाऊजचे प्रकार साडीबरोबर शोभून दिसतात; पण त्यासाठी साडी लक्षपूर्वक निवडावी लागेल.
बॉटम्सचे विविध प्रकार
डेनिम शॉर्ट्स, रिब्ड जीन्स, पलाझो पॅन्ट्स, स्कर्ट्स, कॉटन ट्राऊझर्स, पटियाली सलवार अशा बॉटम्सबरोबर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचे टॉप टीमअप करून जाऊ शकता. एखादी शॉर्ट कुर्ती, क्रॉप टॉप, शर्ट, ओव्हरसाइझ टीशर्ट असे पर्याय त्या बॉटम्ससोबत छान दिसतील; पण यांचे रंग निवडताना काळजी घ्या आणि व्यवस्थित जोडी जमवा.
दागिने
ज्वेलरीमध्ये ओव्हरसाइज नेकपिसेस, इयर िरग्स, नोज िरग्स वापराव्यात. ऑक्सिडाइज दागिने तसेच वेगवेगळ्या भौमितिक आकाराचे दागिने बाजारात उपलब्ध आहेत. होळी पार्टीजसाठी ते आऊटफिटवर उठावदार दिसतात.
फूटवेअर
बूट्स, स्नीकर्स, बॉक्स हिल्सऐवजी ट्रेंडी स्लिप ऑन, चपला, असे ओपन फूटवेयर्स वापरावेत. सध्या बाजारात ते सहज उपलब्ध आहेत.
मेकअप
होळी पार्टी किंवा रंगपंचमीसाठी मेकअपसुद्धा खूप ताजा पण मॅट पद्धतीचा असावा. लीप कलर, आय श्ॉडो, ब्लश हेदेखील नसíगक रंगांमध्ये आणि मॅट पद्धतीत असावे. िपक, पीच या रंगांतील ब्लशचे ट्रेंड इन आहे. त्याचा योग्य वापर करावा. नसíगक शेडमधील आय ब्रो वापराव्यात; पण यासोबत लीप कलर मात्र िपक, हॉट िपक, चेरी रेड, मार्सला, ब्राऊन या छटांमधील वापरावा म्हणजे चेहरा उठून दिसेल. मेकअप करताना तो पाणीप्रतिरोधक असेल याची काळजी घ्यावी.
सौजन्य – लोकप्रभा