Home Remedies Easy Tricks To Remove holi Color: ‘होली है’ म्हणत आपण रंगाची उधळण तर करतोच. पण त्यानंतर अनेक जण होळीमुळे कपडे खराब झाले म्हणून फेकून देतात. पण तुम्हाला तेच कपडे पुन्हा नक्कीच डागाशिवाय वापरता येतील. आश्चर्य वाटलं ना? हो आम्ही खरंच सांगतोय. काही घरगुती सोप्या टिप्सने तुम्ही होळीच्या रंगाचे कपड्यांवरील डाग घालवू शकता. यासाठी तुम्हाला घरच्या काही वस्तूंचाच उपयोग करून घेता येईल. जाणून घ्या आता होळीच्या रंगाचे कपड्यांवरील डाग काढणे होईल अधिक सोपे, कसे ते वाचा.

अल्कोहोल

कपड्यांवर लागलेले हे रंग अल्कोहोलच्या मदतीनं स्वच्छ करू शकता. यासाठी कपडे आधी पाण्यानं धुऊन घ्या. कपडे स्वच्छ झाल्यानंतर एका भांड्यात थोडं अल्कोहोल आणि पाणी मिसळा. कपड्यांच्या ज्या भागाला रंग लागला आहे, तो भाग या मिश्रणात भिजवा आणि घासून स्वच्छ करा.अल्कोहोलचा कपड्यांवरील डागांसाठी जालीम उपाय आहे. हट्टी डाग जातच नसतील तर अल्कोहोलचे काही थेंब पाण्यात घाला. त्यात कपडे बुडवा आणि नंतर डिर्टंजटने कपडे घासून धुवा. त्वरीत डाग निघून जातील.

व्हाइट व्हिनेगार

कपड्यांवरून गुलाल आणि रंगाचे डाग काढण्यासाठी व्हाइट व्हिनेगारचासुद्धा वापर करता येईल. व्हिनेगारने कपडे स्वच्छ करण्यासाठी आधी ते नीट धुऊन घ्या. त्यानंतर एक जग पाण्यामध्ये व्हिनेगार घाला. व्हिनेगारच्या पाण्यात कपडे थोडा वेळ भिजवून ठेवा. नंतर हे कपडे घासून स्वच्छ करा.

लिंबाचा रस

कपड्यांवर न निघणारा रंग लागला असेल तर तो सहज काढण्यासाठी लिंबाचा रस नक्की वापरा. जिथे डाग आहे, तिथे लिंबाचा रस लावा. कापड गरम पण्यानं धुवा. अशा रीतीने तुम्ही कपड्यांवरचे न निघणारे डागही सहज काढू शकता.लिंबाचा रस आणि मीठ रंगाचे डाग काढण्यासाठी एक पारंपारिक उपाय आहे. एका कपात लिंबाचा रस आणि दोन चमचे मीठ घाला. हे मिश्रण रंगाच्या डागावर लावा आणि काही वेळासाठी ठेवा. नंतर, कपड्यांना कोमट पाण्यात धुवा. लिंबाचा रस आणि मीठ रंगाच्या धब्ब्याला मऊ करतात आणि काढणे सोपे बनवतात.

बेकिंग सोडा

रंग खेळल्यानंतर कपडे स्वच्छ करणं आणि डाग काढणं यासाठी बेकिंग सोडाही वापरता येईल. कपडे गरम पाण्यात भिजवून त्यात बेकिंग सोडा घालून ठेवा. कपडे एक-दोन तास भिजल्यानंतर साबणानं घासून स्वच्छ धुवावेत.

कोमट पाणी

रंगाचे डाग कपड्यांवरून काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. डाग लागलेल्या कपड्यांना आधी कोमट पाण्यात भिजवा. त्यानंतर त्यात कास्टिक सोडा घाला. बेकिंग सोडा हा खाण्यासाठी असतो तर कास्टिक सोडा हा खास कपडे धुण्यासाठी बनवलेला असतो. कास्टिक सोडा घातल्यानंतर त्यावर थोडासा साबण किंवा लॉन्ड्री डिटर्जेंट घाला. कपडे १ तास या पाण्यात भिजत ठेवा. नंतर, साध्या पाण्यात बुडवून मगच ब्रश किंवा हाताने चांगले घासून काढा. ही पद्धत डाग सैल करण्यास मदत करते आणि नंतर धुणे सोपे होते.