अनेक लहान मुलांची त्वचा सतत कोरडी होत असते, हवामानातील बदलानुसार याचे प्रमाण वाढू शकते. या कोरड्या त्वचेवर पालक अनेक उपाय करून पाहतात, पण त्यानेही अनेकवेळा फरक दिसत नाही. त्वचा कोरडी झाल्याने त्यावर खाज येणे, एलर्जी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. या गंभीर समस्या नसल्यामुळे यावर सोपे घरगुती उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. यावर कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात जाणून घ्या.
हायड्रेशन
मुलांची त्वचा कोरडी होण्याचे एक कारण त्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी नसणे, हे असू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना नेहमी हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या वयानुसार त्यांनी दररोज किती पाणी प्यावे हे ठरवले जाते. त्यामुळे पालकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
तेलाने मालिश करा
लहान मुलांच्या कोरड्या त्वचेवर तेलाने मालिश करणे हा उत्तम घरगुती उपाय मानला जातो. यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळण्याबरोबर मुलांना निरोगी राहण्यासाठीही फायदेशीर ठरते.
बदलत्या हवामानानुसार मुलांची काळजी घ्या
बदलत्या हवामानामुळे मुलांची त्वचा कोरडी होण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऋतू बदलताना, हवामानात होणाऱ्या बदलानुसार मुलांची काळजी घ्या.
आणखी वाचा : ‘या’ भाज्या करतात High Blood Pressure नियंत्रित ठेवण्यासाठी मदत; लगेच करा आहारात समावेश
लहान मुलांना कोमट पाण्याने अंघोळ करण्याची सवय लावा
लहान मुलांना कोमट पाण्याने अंघोळ घातल्याने त्यांची त्वचा मॉइश्चराईज राहण्यास मदत होते. यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होईल.
लहान मुलांनी जास्त वेळ पाण्यात खेळू नये
अंघोळीनंतर किंवा इतर वेळी लहान मुलांना जास्त वेळ पाण्यात खेळायला आवडते, पण यामुळे त्यांची त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांनी जास्त वेळ पाण्यात खेळू नये.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)