आजच्या काळात अनेक लोकांना कोरड्या त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचा सतत कोरडी पडत असेल, तर ती व्यक्ती वयाने मोठी दिसतेच पण त्याचबरोबर अशा व्यक्तींना त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यताही अधिक असते. यामुळे डॉक्टरांकडे जाऊन काहीवेळा उपचार करून घ्यायला लागतात.
कोरड्या त्वचेवर उपाय म्हणून घरच्या घरी अनेक साधने उपलब्ध आहेत. दूध आणि हळद ही त्यापैकी सर्वांत प्रभावी साधने. दूधामध्ये स्निग्धता असल्यामुळे त्याचा कोरड्या त्वचेवर उपाय म्हणून वापर करता येतो. त्याचबरोबर दूधामध्ये विटामिन ए, बी६, बी१२, डी देखील असतात. यामुळे कोरड्या त्वचेचे प्रमाण कमी होऊन शरीरातून तेल निर्माण होण्याची प्रक्रिया वाढते. त्वचेचे रक्षण करण्यासाठी शरीरातून काही प्रमाणात तेलाची निर्मिती होत असते. तेल निर्मितीचे प्रमाण कमी झाले की कोरडी त्वचा वाढू लागते. त्यामुळे या स्थितीत दूध प्रभावी ठरते. दूधावरील सायही कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये स्निग्धता असल्यामुळे त्वचेवरील रखरखितपणा कमी होण्यास मदत होते. दूधासोबतच कोरड्या त्वचेवर उपाय म्हणून हळदही तितकीच प्रभावी आहे. हळदीमधील घटक हे त्वचा कोरडी पडू नये, यासाठी मदत करतात.
कोरड्या त्वचेसाठी दूध आणि हळद उपयोगी
दूधावरील सायही कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते
Written by विश्वनाथ गरुड
आणखी वाचा
First published on: 11-09-2015 at 12:00 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies for dry skin try turmeric and milk