Monsoon Skincare Routine : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात रोगराई पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे प्रत्येकजण स्वत:ला आजारांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. पावसाळ्यात त्वचेशी संबंधित आजार होण्याचीही दाट शक्यता असते. पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असल्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स सतत येतात.
जर पावसाळ्यात तुम्हाला तुमची त्वचा निरोगी हवी असेल तर या ऋतूमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची, हे जाणून घ्या.
हेही वाचा : बायकांनो, नवऱ्याचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का, हे कसं ओळखायचं? ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
पावसाळ्यात नेहमी तुमचा चेहरा स्वच्छ ठेवावा. जर तुम्ही बाहेरून आला असेल तर सर्वात आधी चेहरा फेसवॉशनी धुवा. चांगल्या त्वचेसाठी तुम्ही कडूलिंब, ग्रीन टी इत्यादी फेसवॉश वापरू शकता.
पावसाळ्यात चेहऱ्यावरचा ग्लो कायम ठेवण्यासाठी गुलाबजलचा वापर करा. गुलाब जलमुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. गुलाब जल तुम्ही टोनर म्हणूनही वापरू शकता. पावसाळ्यात कधीही जास्त फेस क्रीम लावू नका, त्याऐवजी गुलाबजलचा उपयोग करा.
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?
पावसाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेवर ऑइल जमा होते, ज्यामुळे त्वचा ऑइली दिसून येते. याच कारणाने चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि चेहरा खराब दिसतो. ऑइली त्वचेसाठी डस्टिंग पावडरचा वापर करणे फायदेशीर ठरते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)