युरिक ॲसिड हा रक्तातील एक टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीरात प्युरीन नावाची संयुगांचे विघटन होते तेव्हा युरिक ॲसिड तयार होते. सामान्य परिस्थितीत, यूरिक ॲसिड किडनी आणि मूत्राद्वारे उत्सर्जित होते. प्युरीन्स सामान्यतः शरीरात तयार होतात, तसेच काही पदार्थ आणि पेयांमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण जास्त प्रमाणात प्युरीनयुक्त अन्न सेवन करतो तेव्हा शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढू लागते. यामुळे गाउट, किडनीचे आजार, हृदयविकार आणि हाडांचे नुकसान यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
रक्तातील यूरिक ॲसिडची पातळी नेमकी किती असावी
Webmd नुसार, शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी शोधण्यासाठी यूरिक ॲसिड रक्त तपासणी केली जाते. याला सीरम यूरिक ॲसिड चाचणी, सीरम यूरेट किंवा यूए असेही म्हणतात. या चाचणीपूर्वी, डॉक्टर तुम्हाला ४ तास किंवा त्याहून अधिक काळ काहीही न खाण्यास सांगू शकतात.
जर या चाचणीमध्ये ॲसिडची पातळी महिलांसाठी ६ mg/dL पेक्षा जास्त आणि पुरुषांसाठी ७ mg/dL पेक्षा जास्त असेल तर ती उच्च यूरिक ॲसिड पातळी मानली जाते. दीर्घकाळ उपचार न केल्यास गंभीर लक्षणे दिसू शकतात
उच्च यूरिक ॲसिडची लक्षणे
- सांधेदुखी आणि सूज
- सांध्याभोवतालच्या त्वचेचा रंग बदलणे
- पाठदुखी
- हात दुखणे
- वारंवार लघवी
- लघवीमध्ये रक्त आणि दुर्गंधी
- मळमळ किंवा उलट्या
- मुतखडा
- संधिरोग
( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ४ पदार्थ? डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत)
यूरिक ॲसिड सामान्य ठेवण्यासाठी वजन कमी करा
संशोधनात असे दिसून आले आहे की यूरिक ॲसिडची पातळी एखाद्या व्यक्तीच्या बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि मेटाबॉलिक सिंड्रोमशी संबंधित आहे. आहारातील बदल आणि नियमित व्यायामाद्वारे रक्तातील यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत होऊ शकते.
यूरिक ॲसिड जास्त असल्यास पुरेसे पाणी प्या
शरीरातील पाण्याची कमतरता हे यूरिक ॲसिडचे उच्च स्तर आणि संधिरोगाचे कारण असू शकते. त्यामुळे पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला तज्ञ देतात. दररोज ६ ते ८ ग्लास पाणी पिण्याची शिफारस डॉक्टरांकडून केली जाते, जी हवामान आणि दैनंदिन क्रियेनुसार बदलू शकते.
प्युरीनयुक्त पदार्थ शरीरातील यूरिक ॲसिड वाढवण्याचे काम करतात
मासे, सीफूड आणि शेलफिश, सार्डिन, शिंपले, कॉडफिश, ट्राउट आणि हॅडॉक, बेकन, टर्की, लाल मांस आणि लिव्हर यांसारखे उच्च प्युरीन असलेले पदार्थ टाळा.
तुमच्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’ असलेल्या पदार्थांचा समावेश करा
अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन सी यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. याचे कारण त्यात असलेले अँटिऑक्सिडंट असू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उच्च यूरिक ऍसिडची लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, स्प्राउट यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाऊ शकता.
( हे ही वाचा: नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढवेल ‘हा’ चिकट पदार्थ; वेळीच जाणून घ्या खाण्याचे ‘हे’ योग्य प्रमाण)
तणावमुक्त राहा
तज्ज्ञांच्या मते तणाव आणि युरिक ॲसिड यांचा संबंध आहे. दैनंदिन ताण शरीरात यूरिक ॲसिड पातळी वाढवू शकतो. त्यामुळे उच्च युरिक ॲसिडचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी तणावमुक्त राहण्याची सवय ठेवा.