मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा आढावा..
* ओवा-
ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.
* आहारात केळी असवीत-
केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्वा असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.
* तुळस
तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
* द्राक्षे खावीत
या मोसमांत द्राक्षेही चांगली येतात आणि किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्रक्षात अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.
वरील नैसर्गिक पदार्थांमुळे किडनी स्टोनच्या आजारावर आराम मिळू शकतो. मात्र, ग्रस्तांनी यावर तज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल उचलावे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘किडनीस्टोन’वर घरगुती उपाय
मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा आढावा..

First published on: 10-01-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies for kidney stones