रोजच्या धावत्या आयुष्यात दोन मिनिट बसायला ज्यांना वेळ नाही त्यांना टेन्शन घेऊ नका असं आम्ही सांगणार नाही. मुळात कोणी सांगितल्याने तुमचा तणाव जाणार नाही त्यासाठी आपणच स्टेप बाय स्टेप काम करणे गरजेचे आहे. मात्र हे तणाव विनाकारण रोगांना आमंत्रण देतात त्यातील एक सर्वात घातक रोग म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये असंतुलन. साधारण ९०/६० mmHg ते १२०/८० mmHg दरम्यान असणारा रक्तदाब हा परफेक्ट मानला जातो. याहून अधिक किंवा कमी रक्तदाब हा आरोग्यासाठी घातक असतो. जर का आपल्याला वारंवार टेन्शन घेतल्याने सतत रक्तदाब कमी झाल्याची तक्रार सतावत असेल तर आज आपण एक घरगुती सोपा उपाय पाहणार आहोत.
लक्षात घ्या तणाव सोडून आनंदी राहणे हा रक्तदाबावरील सर्वात सोपा उपाय आहे मात्र इन्स्टंट त्रास होत असेल तर थंड दूध हा तुमचा घरचा रामबाण उपाय ठरेल. हाडांची मजबुती ते शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी गरम किंवा कोमट दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कमी रक्तदाबाच्या समस्येवर थंड दुधाचे सेवन अधिक फायदेशीर ठरते.
थंड दुधाचे फायदे
- थंड दुधात पोटेशियम, फॉस्फाेरस, विटामिन व कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.
- अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या माहितीनुसार रक्तदाब कमी झाल्यास थंड दुधातील पोटॅशियम प्रेशर संतुलित करण्यास मदत करते
- थंड दुधामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते
- उपवासाच्या दिवशी विशेषतः थंड दूध प्यावे ज्याने वारंवार भूक लागणे बंद होते.
- याशिवाय थंड दुध चेहऱ्याला लावल्यास त्वचेला सुद्धा फायदा होतो.
Smart Kitchen Tips: दुधावर घट्ट साय हवी तर या 5 सोप्या टिप्स नक्की वापरा
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ च्या माहितीनुसार थंड दुधातील कोलाईन आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात ज्यामुळे स्मरणशक्ती व मूड चांगला राहण्यास मदत होते. मूड हलका राहिल्यास लॉन्ग टर्म मध्ये सुद्धा तणाव कमी व्हायला व रक्तदाब संतुलित राहायला मदत होते.