हल्ली कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये केस गळतीची, केस न वाढीची समस्या जाणवत आहे. आपले सुंदर, निरोगी केस असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे, असंतुलित आहारामुळे केसांवर वाईट परिणाम होतात. केसांसाठी नक्की काय वापरायचं हा मोठा प्रश्न असतो. अनेकदा आपण केसांसाठी महागडे प्रोडक्टही विकत घेतो. पण या रासायनिक प्रोडक्ट्स पेक्षा घरगुती आणि पारंपारिक पद्धती खूप फायदेशीर ठरतात. अशाच काही नैसर्गिक आणि घरगुती उपायांची माहिती बघुयात.
कांद्याचा रस
कांद्याचा रस हा जुना आणि प्रभावी उपाय आहे. केसांच्या वाढीसाठी याचा वापर फार आधीपासून केला जातो. कांद्यामध्ये असलेले सल्फर कोलाजेन उत्पादन वाढवण्यास मदत करते. तसेच केसांच्या पुनरुत्पादनाससुध्या उपयोगी ठरते. कांद्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सर मध्ये फिरुवून घ्या. तयार झालेल्या मिश्रणातून रस पिळून घ्या. ह्या रसाने टाळूवर मालिश करा. १५ ते २० मिनिटे ठेवा आणि स्वच्छ धुवा.
एरंडेल तेल
कांद्याच्या रसाप्रमाणे केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल हा उत्तम उपाय आहे. एरंडेल ओमेगा – ६ फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन ई, प्रथिने आणि केसांच्या मॉइस्चराइझिंगसाठी आवश्यक असलेली इतर पोषक द्रवे आहेत. या तेलामध्ये बुरशी न लागणारे आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म देखील आहेत. हे गुणधर्म केसांच्या वाढीस प्रतिबंधित करतात आणि टाळूवरच्या कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतात. गरम एरंडेल तेलाने केसांना मालिश करावी.
कोरफडीचा गर
कोरफड सर्रास सगळ्यांच्या बागेत उपलब्ध असते. अगदी शहरातील घरांमध्येही लोक कुंडीत कोरफड आवर्जून लावतात. कोरफडीचा गर केस गळतीवर एक उत्तम उपाय आहे. कोरफडीच्या गराचा वापर नियमित केल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते. केसांमधील जास्तीच तेल काढण्यासाठीही याचा वापर होतो. टाळूच्या आणि केसांच्या मॉइस्चराइझिंगसाठी कोरफडीचा गर उत्तम काम करतो. घरी कोरफड नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारे कोरफड जेल नक्कीच वापरू शकता.
अंड्याचा मास्क
ज्याप्रमाणे अंडी आपल्या शरीरासाठी चांगली आहेत. तशीच ती केसांच्या वाढीसाठीसुद्धा उपयुक्त आहे. अंड्यांमध्ये प्रोटीन आणि लेसिथिन असते. जे आपल्या केसांना मजबूत बनवण्यासाठी, पोषण मिळण्यासाठी उपयुक्त ठरतात. एका अंड्यामध्ये एक चमचे ऑलिव्ह तेल आणि मध मिसळा. हे मिश्रण केसांवर लाऊन २० मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने धुऊन शैम्पू आणि कंडीशनर लावा.
आवळा
आवळा हे व्हिटॅमिन, पोषक आणि फॅटी अॅसिड युक्त फळ असते. आवळा खाल्ल्यामुळे केसांना बळकटी येण्यास मदत होते आणि त्यांचे तुटायचे प्रमाण कमी होते. केसांच्या वाढीसाठी आणि टाळूसाठीही आवळा उत्तम आहे.