दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून भारतीय जेवणात याचा भरपूर उपयोग केला जातो. रायते, कढी, कोशिंबीर, चटणी सारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. दही आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे. दही पचायलाही तितकेच सुलभ असते. उपवासाला अनेक जण आवडीने दही खातात.
कधी कधी दही अचानक खूप आंबट होते अशावेळी आपण असे दही फेकून देतो पण असे चुकूनही करू नका. फक्त एक घरगुती उपाय करुन तुम्ही आंबट दही खाण्यायोग्य बनवू शकता. चला तर सविस्तर जाणून घेऊ या.
या कारणामुळे दही होते आंबट
आंबट विरजनाने बनविल्यास दही आंबट होते. याशिवाय फ्रिजमध्ये न ठेवता उष्णतेच्या ठिकाणी दही ठेवल्यास दही आंबट होऊ शकते. बाहेर ठेवल्याने दह्यात बॅक्टेरीया वाढतात त्यामुळे दही आवश्यकतेपेक्षा जास्त आंबट होते.
हेही वाचा : पालकांनो, सार्वजनिक ठिकाणी मुलांना सुरक्षित कसे ठेवावे? त्यांना शिकवा या गोष्टी, नेहमी राहतील सुरक्षित
कसा दूर करावा आंबटपणा
यासाठी सुरुवातीला दह्यातील पाणी बाजूला काढावे. त्यानंतर या दह्यात थंड पाणी टाकावे आणि चम्मच हळूवारपणे दह्यातून फिरवावा. चाळणीने पाणी गाळून घ्यावे आणि वेगळे ठेवावे. त्यानंतर दह्यात एक वाटी थंड दुध टाकावे. त्यानंतर दोन तीन तासांसाठी हे दही झाकून ठेवावे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)