Home remedies to prevent dry cough : दिवाळीसोबतच थंडीचे देखील आगमन झाले आहे. हवामानातील या बदलामुळे संसर्गाचा धोका बळावतो आणि यामुळे अनेक हंगामी आजार डोके वर काढतात. यातीलच एक आहे कोरडा खोकला. या आजारात कफ तयार होत नाही, मात्र घशात वेदना होतात आणि खोकला येतो. काही घरगुती उपचार कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम देऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरड्या खोकल्यावर घरगुती उपचार

१) गरम दूध प्या

कोरड्या खोकल्यामुळे स्वत:ला त्रास तर होतोच, त्याचबरोबर आजूबाजूला बसलेल्या लोकांना देखील त्याचा त्रास होतो. यामुळे इतर लोकांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. अशात कोरडा खोकला घालवण्यासाठी तुम्ही गरम दुधाचे सेवन करू शकता. गरम दूध हळूहळू प्यायल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकते. त्याचबरोबर, गरम दुधात काळी मिरी पावडर घातल्यास लवकर आराम मिळू शकते.

(Covid : ओमायक्रॉनच्या बी.७ व्हेरिएंटने वाढवली चिंता, छातीमध्ये वेदनेसह ‘ही’ आहेत लक्षणे)

२) तुळशीचे पान

तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुळशीचे पान कोरडा खोकला घालवण्यात मदत करू शकते. तुळशीच्या पानांना पाण्यात गरम करा आणि ते पाणी प्या. याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकते.

३) मध

मधाने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकते. मधात ज्येष्ठमध पावडर मिसळा आणि जेवल्यानंतर या मिश्रणाचे सेवन करा. याने केवळ कोरडा खोकलाच नव्हे तर पोटाशी संबंधित विकारांपासून देखील सुटका मिळू शकते.

४) हिंग

हिंगने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकते. हिंगमध्ये अँटि इन्फ्लेमेटोरी गुणधर्म असतात. सर्वात आधी आले बारिक करून त्याची पेस्ट तयार करा आणि नंतर त्यात हिंग मिसळून त्याचे सेवन करा. याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.

निरोगी मेंदूसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्मरणशक्ती वाढण्यात होईल मदत

५) कोमट पाणी

कोमट पाण्यानेही कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकते. यासाठी एक ग्लास पाणी एका भांड्यात हलके गरम करा आणि नंतर त्यात काळे मिठ मिसळून या पाण्याने गुळण्या करा. याने कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies to prevent dry cough ssb