हिवाळ्यात, थंडीच्या दिवसांमध्ये किंवा साधारण हवामान बदलादरम्यान आपल्याला तब्येतीच्या काही कुरबुरी जाणवू लागतात. सर्दी-खोकला यांसारखे त्रास जाणवल्यावर पटकन एखादे खोकल्याचे सिरप, गोळ्या किंवा डॉक्टरकडे जाऊन त्यांनी लिहून दिलेल्या औषधांचा उपयोग करतो. मात्र अशा सामान्य कुरबुरींसाठी आपल्या घरात, स्वयंपाकघरात अनेक औषधी गोष्टी दडलेल्या असतात. त्यांना जर आपण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरले तर अशा बारीक-सारीक सर्दी खोकल्याला आपण काही दिवसातच पळवून लावू शकतो. अशी माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून आहारतज्ज्ञ किरण कुकरेजाने एका व्हिडीओमार्फत शेअर केली आहे.

किरणने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये किरकोळ सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून गूळ हळदीची गोळी कशी बनवायची ते सांगितले आहे. “या गोळीमध्ये अँटिव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल घटक असल्याने सर्दी-खोकल्याला तर दूर ठेवतेच, त्यासह तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचेही काम करते. त्यामुळे थंडीच्या दिवसात जर साधा खोकला झाला असेल, तर इतर औषधं घेण्याआधी वर्षानुवर्षे वापरला जाणारा हा घरगुती उपाय करून पहा” असे किरण आपल्या व्हिडीओमध्ये सांगते. हळद, गूळ या दोन्हीही पदार्थांमध्ये भरपूर पौष्टिक आणि शरीराला पोषक असणारे घटक उपलब्ध असतात. त्यामुळे यांचा वापर करून, हिवाळ्यात आपले आरोग्य जपण्यासाठी घरगुती गूळ हळदीच्या गोळ्या कशा बनवायच्या ते पाहूया.

Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Weight Lose Tips
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; महिनाभरात कमी होईल वजन, दिसाल फिट
turmeric, turmeric high rates, effect weather turmeric,
उच्चांकी दरानंतरही हळदीच्या लागवडीत घट, प्रतिकूल हवामानाचा हळदीवरील परिणाम काय ?

हेही वाचा : दररोजच्या वापरातल्या गुळाची ‘शुद्धता’ कशी तपासावी? पाहा, तुमची मदत करतील ‘या’ सात टिप्स…

गूळ हळदीच्या गोळ्या

साहित्य

१ चमचा हळद
१ चमचा आल्याची पावडर
१ चमचा गूळ
१ चमचा शुद्ध गाईचे तूप

कृती

सर्वप्रथम एका वाटीमध्ये किंवा बाऊलमध्य एक चमचा हळद आणि आल्याची पावडर घ्या.
त्यामध्ये गुळाची पावडर किंवा चिरलेला एक चमचा गूळ आणि चमचा शुद्ध तूप घालून घ्या.
सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्या.
आता या मिश्रणाच्या लहान-लहान गोळ्या तयार करा.

हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी चालणे, नाचणे, सायकलिंग करणे का ठरते फायदेशीर? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

वापर

थंडीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या साध्या सर्दी-खोकल्यासाठी एक गोळी सकाळी आणि एक गोळी रात्री झोपण्याआधी चघळावी. अशी माहिती इन्स्टाग्रामवरील आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी आपल्या व्हिडीओमधून दिली आहे.

किरणने तिच्या @nuttyovernutritionn या अकाउंटवरून या सोप्या आणि फायदेशीर अशा गूळ हळदीच्या गोळ्यांची रेसिपी शेअर केली असून आत्तापर्यंत याला १४३K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.