Coconut Soup Recipe: नूडल्ससह थाई कोकोनट सूप ही एक स्वादिष्ट सूप रेसिपी आहे, जी अनेक ठिकाणी दुपारच्या जेवणात खाल्ली जाते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात ही रेसिपी खूप आवडते. यामध्ये मिरची, बटन मशरूम, बेबी कॉर्न, ग्रीन थाई करी पेस्ट, नारळाचे दूध आणि नूडल्स यांसारख्या गोष्टी जोडल्या जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही भाज्याही घालू शकता. तुम्ही बऱ्याच प्रकारचे नूडल्स खाल्ले असतील, मात्र कोकोनट सूप नूडल्स ट्राय केले नसतील. चला तर मग जाणून घ्या नारळ सूप नूडल्स कसे बनवायचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकोनट सूप नूडल्ससाठी लागणारे साहित्य

  • २ कप नूडल्स
  • २ तुकडे चिरलेले आले
  • १/२ कप चिरलेला बेबी कॉर्न
  • ५०० मिली नारळाचे दूध
  • १ लिटर शाकाहारी स्टॉक
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • २ चिरलेली थाई मिरची मिरची (पर्यायी)
  • १/२ कप बटण मशरूम
  • २ टीस्पून हिरवी करी पेस्ट
  • ४ चमचे लिंबाचा रस
  • १ टीस्पून रिफाइंड तेल

( हे ही वाचा: Noodles Boiling Tips: नूडल्स चिकट होण्यापासून रोखण्यासाठी, अशा प्रकारे उकळवा; जाणून घ्या स्टेप्स)

कोकोनट सूप नूडल्स कसे बनवायचे?

ही स्वादिष्ट नूडल्स सूप रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यात नूडल्स घाला. नूडल्स शिजवण्यासाठी पुरेसे पाणी घाला आणि नूडल्स उकळवा. नूडल्स उकळवून पूर्ण झाल्यावर बाजूला ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये थोडं तेल घाला आणि त्यात मिरच्या, आले घालून ३० सेकंद परतून घ्या. नंतर यात बेबी कॉर्न आणि कापलेले मशरूम घालून २ मिनिटे शिजवा. त्यात पाणी सुटू लागले की त्यात करी पेस्ट घालून मिक्स करा आणि चांगले मिसळा. त्यानंतर पुन्हा ५ मिनिटे उकळवा. नंतर त्यात नारळाचे दूध आणि लिंबाचा रस घाला आणि वरून चवीनुसार मीठ टाका, सर्वकाही मिक्स करा आणि मसाले मिसळत रहा.आता पॅनमध्ये अर्धे उकडलेले नूडल्स घाला आणि सूप तयार होईपर्यंत शिजवा. झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade coconut soup noodles learn how to make gps