Summer Season: उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. अशाच डिहायड्रेशन होणे किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येणे या गोष्टी सामान्य मानल्या जातात. पण जर शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण बिघडल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. असे झाल्याने पोट सूजणे, पोटात गोळा येणे किंवा अ‍ॅसिडिटी अशा गोष्टी संभवतात. अशा वेळी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यामध्ये पोटात गोळा आल्यास डॉक्टराचा सल्ला घेऊन उपचार करणे योग्य मानले जाते. पण कधी-कधी हा त्रास घरगुती उपाय करुन कमी होऊ शकतो. पोटात गोळा येणे तसेच पोटदुखी होणे यांवर उपयुक्त असलेल्या हेल्थ डिंक्स संबंधित माहिती आम्ही देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुदीना (Peppermint)

पोटाशी संबंधित आजारांवर पुदीना प्रभावशाली असतो असे म्हटले जाते. डॉक्टरदेखील याचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. उन्हाळ्यात पोटात गोळा येऊ नये यासाठी पुदीन्याची पाने, काकडीचे बारीक तुकडे पाण्यामध्ये टाकावे. पुढे ते मिश्रण ब्लेंड करुन त्याचे सेवन करावे. या हेल्थ ड्रिंकमध्ये लिंबाचा रस देखील टाकू करावे.

आलं (Ginger)

आलं शरीरासाठी फायदेशीर असते. याच्यापासून तयार करण्यात आलेल्या हेल्थ ड्रिंकच्या सेवनाने पोटाचे विकार थांबू शकतात. आल्याचे तुकडे पाण्यात टाकून हेल्थ ड्रिंक तयार करते येते. आलं आणि लिंबू टाकून हर्बल टी तयार करुन पिणे देखील पोटासाठी फायदेशीर ठरते. यामुळे उन्हाळ्यात पोटाला गारवा मिळतो.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू; उष्माघातापासून कसा कराल स्वत:चा बचाव; जाणून घ्या

बडीशेप (Fennel Seeds)

बडीशेपचे अनेक फायदे आहेत. याच्या गुणधर्मांमुळे पोटाचे विकार रोखण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रणात राहावा यासाठी बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवावी आणि सकाळी ते पाणी प्यावे. ग्रीन टी बनवण्यासाठीही हे पाणी वापरता येते. याचे सेवन करताना त्याच्या प्रमाणाबाबतीत सतर्कता बाळगावी.

आणखी वाचा – उन्हाळ्यात सायनसचे प्रमाण का वाढते? हा त्रास कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते?

हिरवी वेलची (Green Cardamom)

पोट साफ व्हावे यासाठी हिरव्या वेलचीचा वापर जेवणामध्ये केला जातो. याशिवाय चहा बनवतानाही हा पदार्थ वापरला जातो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट थंड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात हिरवी वेलची टाकून तयार करण्यात आलेली आईस टी प्यायल्याने पोटात गोळा होण्याची समस्या दूर होते. यासाठी वेलची पाण्यात टाकून ते पाणी उकळावे. पुढे ते मिश्रण गार झाल्यावर त्याचे सेवन करावे.

(टीप – आहारामध्ये कोणतेही बदल करताना किंवा वरील पदार्थांचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे त्रासदायक ठरु शकते.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade health drink to avoid summer bloating know more yps
Show comments