Homemade oil for hair growth Meera Rajput secret: स्त्री-पुरुषांचं सौंदर्य हे केसात असतं असं अनेक जण म्हणतात. स्त्रिया आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी अनेक पर्यायी उपाय वापरून बघतात. पण त्यातले सगळेच उपाय फायदेशीर ठरतील असं नाही.
गेल्या अनेक दशकांपासून केसांसाठी तेलाचा वापर केला जातो परंतु फक्त तेलाच्या वापराने केसांचे आरोग्य सुदृढ राहण्यासं तितकी मदत होत नाही तसंच, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात केसांची काळजी घेणंदी थोडं अवघडच झालं आहे.
हेही वाचा… लिफ्टमध्ये अडकला माणूस पण मागे वळताच…; नेमकं घडलं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
आता आलेल्या केमिकल ट्रीटमेंट्समुळे अनेकदा केस गळणे, केसांची वाढ खुंटणे तसंच केसांचं नैसर्गिक सौंदर्य जाणे अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. यामुळे आपण सेलिब्रिटी वापरत असलेले महागडे प्रोडक्ट्स वापरण्यास सुरुवात करतो, पण त्याचाही काही फायदा होत नाही.
मीरा राजपूतच्या चमकदार केसांचं रहस्य (Meera Rajput homemade hair oil)
अनेकदा कलाकारदेखील असे महागडे प्रोडक्ट्स न घेता घरगुती (Homemade oil for hair growth) उपाय करतात आणि आपल्या केसांची काळजी घेतात. बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरदेखील तिच्या केसांची काळजी आयुर्वेदिक तेलाने घेते. हे तेल ती घरच्या घरी बनवते. चला तर मग जाणून घेऊयात या तेलाची रेसिपी.
साहित्य (Homemade oil for hair growth ingredients)
१. जास्वंद (Hibiscus)
२. कढीपत्ता (Curry leaves)
३. मेथीचे दाणे (Fenugreek seeds)
४. खोबरेल तेल (Coconut Oil)
५. आवळा किंवा आवळा पावडर (Amla or Gooseberry Powder)
६. कडूलिंब (Neem)
७. शेवग्याची पाने (Moringa leaves)
हे तेल कसे तयार कराल? (How to make Homemade oil for hair growth)
१. प्रथम दोन जास्वंदाची फुले आणि आठ ते नऊ जास्वंदाची पाने घ्या. आता हे दोन्ही साहित्य बारीक करून घ्या आणि त्याची एक पेस्ट तयार करा.
- जास्वंदात अमिनो ॲसिड असल्याने ते केस मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.
२. एका पॅनमध्ये थोडे खोबरेल तेल घ्या आणि ते गरम करा. आता या तेलात जास्वंदाची पेस्ट मिक्स करा.
- खोबरेल तेलातील लॉरिक ॲसिड केसांमधून गेलेलं केराटीन परत आणण्यास मदत करते.
३. नंतर या मिश्रणात एक टीस्पून मेथी किंवा मेथीचे दाणे टाका.
- मेथीमध्ये फ्लेव्होनॉइड्स (flavonoids) असतात, ज्यामुळे केसांची वाढ होते.
४. तसेच तयार झालेल्या या मिश्रणात आता एक टीस्पून आवळा किंवा आवळा पावडर आणि कढीपत्ता टाका.
- आवळा आणि कढीपत्त्यामुळे केस लवकर पांढरे होण्याचा धोका टळतो.
५. आता या मिश्रणात कडूलिंब आणि शेवग्याची पाने घाला.
- कडूलिंबाच्या ॲटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे टाळूचे (Scalp) आरोग्य सुधारते आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने समृद्ध असलेला शेवगा केसांसाठी सर्वोत्तम आहे.
६. हे सगळे मिश्रण थोडावेळ उकळून घ्या आणि गॅस बंद करून त्याला थोडे थंड होऊ द्या.
७. शेवटी तयार झालेले हे मिश्रण ग्लास, जार किंवा एका बॉटलमध्ये साठवून ठेवा. केस शांपूने धुण्याआधी हे तेल वापरून पाहा.