facemask उन्हाळ्यात त्वचेचा उजाळा काही केल्या टिकवून ठेवता नाही. त्वचा काळपट आणि रफ होतो. तुम्ही घराच्या बाहेर जा अथवा नका जाऊ, सुर्याची किरणं तुमच्या त्वचेचा ग्लो कमी करतात. अशावेळी सनस्क्रिन किंवा अन्य काही क्रिम लावूनही उपयोग होत नाही, शिवाय या केमिकलयुक्त कॉस्मेटिकमुळे इनफेक्शन होण्याचीही भिती असते. अशावेळी तुम्ही स्वच्छ आणि तेजस्वी त्वचा मिळविण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असाल तर किचनमधील काही पदार्थांचा उपयोग करुन सौंदर्य टिकवून ठेऊ शकता. यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करु शकता. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे त्वचेला फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे हे फेसपॅक.

टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक –

पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करा त्यात १ चमचा मध घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा आणि कोमट पाण्यानं धुवुन टाका. हा फेस पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतो.

टोमॅटो, लिंबू आणि दही फेल मास्क –

टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यामुळे त्वचेला फायदा होतो. हा मास्क नॅचरल ब्लीचचं काम करतो. या मास्कमुळे चहेऱ्यावरील त्वचेचे केस कमी होतात. त्वचा तजेलदार आणि चमकदार होते.

टोमॅटो आणि गव्हाच्या पीठाचा मास्क –

पिकलेल्या टोमॅटोची प्युरी करा आणि गव्हाच्या पिठामध्ये पूर्णपणे मिसळा. तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे राहू द्या. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

टोमॅटो आणि हळदीचा मास्क –

टोमॅटोच्या प्युरीमध्ये हळद पावडर घाला आणि नीट मिक्स करा. मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटे तसेच चेहऱ्यावर राहुद्यात. हा फेस मास्क त्वचेला उचळ करण्यास मदत करतो.

वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Story img Loader