तज्ज्ञांचे मत
श्वसनाविषयक आजारांमध्ये होमिओपॅथी उपचार पद्धतीची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असून आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाला इनेहेलर, डोस आणि स्टेरायड घेण्याची आवश्यकता नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
प्रदूषण, धूम्रपान, रक्तसंचय आणि संसर्गातून होणाऱ्या अस्थामा, ब्राँकायटिस(फुप्फुसांच्या नळ्यांना आलेली सूज), अॅलर्जी, न्युमोनिया, फुप्फुस दाह(सीओपीडी) यांसारख्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी होमिओपॅथी अतिशय उपयुक्त उपचार पद्धती आहे. या आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्णांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार केल्यास दुष्परिणामांवर सामोरे जावे लागणाऱ्या इनेहेलर किंवा अन्य पद्धती वापरण्याची गरज नसल्याचे मत भारतातील वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाशी सलंग्न असलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय संस्थेचे ए. के. गुप्ता यांनी व्यक्त केले.
नेहरू होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहिती विभागाचे प्रमुख संजय पांडे यांनी होमिओपॅथीमध्ये वापरण्यात येणारी विविध औषधांची माहिती सांगितले. काही दुर्मीळ उपायांमध्ये दालचिनी, बडिशेप आणि अन्य वनस्पतींचा वापरही केला जातो. याच अनुषंगाने होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक फ्रेडरिक सॅम्युअल हाहनेमन यांच्या १० एप्रिल रोजी असलेल्या जन्मदिनाचे औचित्य साधताना जागतिक होमिओपॅथी दिनाला भारतात पहिल्यांदाच आयुष मंत्रालय व लिंगा मेडीकोरम होमिओपॅथिक या आतंरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या साहाय्याने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला होमिओपॅथीच्या विद्यमान परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी भारतासोबतच जगभरातील दोन हजाराहून अधिक तज्ज्ञ उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
श्वसनविषयक आजारांवर होमिओपॅथी उपयुक्त
सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाला इनेहेलर, डोस आणि स्टेरायड घेण्याची आवश्यकता नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

First published on: 18-03-2016 at 01:51 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homeopathy helpful on respiratory illness