होंडा कंपनीने वर्ष 2015 मध्ये टोकियो मोटर शोमध्ये थ्री-व्हिलर (तीन चाकांची मोटर) सादर केली होती. युरोपियन पेटंट ऑफिसकडून होंडा कंपनीला त्यांच्या या थ्री व्हिलर Honda NeoWing साठी अखेर पेटंट मिळालं आहे. परिणामी कंपनीकडून ही थ्री-व्हिलर लवकरच लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टिअरिंगसाठी या थ्री-व्हिलरच्या पुढील बाजूला दोन चाकं देण्यात आली आहेत, तर मागील बाजूला एक चाक आहे. हे चाक इंजिनशी जोडण्यात आलं आहे. होंडा गोल्ड विंग बाइकमध्ये वापरण्यात आलेल्या इंजिनाचाच वापर या थ्री-व्हिलरसाठीही करण्यात आल्याचं समजतंय.

फीचर्स-
Honda NeoWing चं इंजिन गोल्डविंग फ्लॅट सिक्स 1833cc इंजिनवर आधारित असण्याची शक्यता आहे. ही कंपनीची पहिली 3 व्हिलर मोटरसायकल असेल. कमी क्षमतेच्या थ्री व्हिलर बाजारातही ही गाडी उतरवण्याचा कंपनीचा विचार आहे. यामध्ये क्रुझर बाइक्सप्रमाणे सिटिंग स्टांस असून LED लाइट्स, अलॉय व्हिल्स, डबल बॅरल एक्झॉस्ट आहेत. मात्र या गाडीच्या अधिकृत लाँचिंगबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. स्टाइलसाठी  होंडा नियोविंगमध्ये शार्प आणि अँग्युलर लाइन्स देण्यात आल्यात.

होंडाच्या या थ्री-व्हिलरमध्ये आणि यामाहा कंपनीच्या ‘निकेन’ बाइकमध्ये बरंच साम्य आहे. ‘निकेन’ला रायडर स्पोर्ट्स बाइकप्रमाणे 45 अंशापर्यंत झुकवता येतं. यामाहाच्या या बाइकमध्ये 874cc इनलाइन थ्री सिलिंडर मोटर इंजिन असून हे इंजिन 111.8bhp ची पीक पावर आणि 87.5Nm टॉर्क जनरेट करतं. बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देखील आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hondas three wheeler honda neowing