घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटक आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी आहेत. मधाचेही अनेक फायदे आहेत. मध आणि दालचीनी एकत्र घेतल्यानंतर आरोग्यास काय फायदा होतो पाहूयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– चिमुटभर दालचीनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.

– अर्धा चमचा दालचीनी पावडर आणि मध मिसळून गरम पाण्यातून प्यायल्यास अर्थरायटीसच्या दुखण्यापासून आराम मिळतो. हे मिश्रण दुखत असलेल्या जागेवरही लावू शकता.

– तीन चमचेच दालचीनी पाउडरमध्ये दोन चमचे मध मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या. याचं नियमीत सेवन केल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाण दहा टक्के कमी होऊ शकते.
– चीनमध्ये महिला आपल्या गर्भशयाला मजबूत करण्यासाठी दालचीनी पावडर खातात. अनेक अभ्यासातून असेही समोर आलेय की, दालचीनी पावडरीचं नियमीत सेवन केल्यास पॉलीसिस्टिक ओवरियन सिंड्रोम (PCOS) मध्ये वाढ होते.

– दिवसातून तीन वेळा गरम पाण्यासोबत मध आणि दालचीनी पिल्यास वजन कमी होतं. सकाळी, त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी हे मिश्रण घ्यावं. या मिश्रणामुळे फॅट कमी होतं.

– ज्यांना स्कीन इंफेक्शन असेल त्यांच्यासाठी मध आणि दालचीनीचं सेवन वरदान आहे. मध आणि दालचीनीचं सेवनामुळे किटाणू मरतात.

  • दालचीनीचे फायदे

– दालचीनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात.

– थंडीमुळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.

– दालचिनी,मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.

– मुरुमे(Pimples) जाण्यासाठी दालचिनीचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून लावावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey and cinnamon benefits these 6 wonderful benefits are from consuming honey and cinnamon together honey and cinnamon health benefits nck