Honor 20 Lite हा नवा स्मार्टफोन मलेशियामध्ये लाँच  करण्यात आला आहे.  21 मे रोजी कंपनीने एका इव्हेंटचं आयोजन केलं असून यावेळी Honor 20 Lite हा स्मार्टफोन भारतीय बाजारातही लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच केलेल्या Honor 10 Lite स्मार्टफोनची पुढील आवृत्ती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलेशियाच्या चलनानुसार RM 949 म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 15 हजार 900 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. Honor 20 Lite हा स्मार्टफोन फँटम रेड, फँटम ब्ल्यू आणि मिडनाइट ब्ल्यू या रंगांमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे.

Honor 20 Lite स्पेसिफिकेशन –
हॉनर 20 लाइट हा स्मार्टफोन अँन्ड्रॉइड 9 पायवर आधारित ईएमयूआय 9.0 वर कार्यरत राहिल. या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये 6.21 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल आणि 19.5:9 अॅस्पेक्ट रेशो) डिस्प्ले आहे. स्मार्टफोन जलदगतीने कार्यरत रहावा यासाठी यामध्ये हायसिलिकॉन किरिन 710 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये 3,400 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन जुन्या आवृत्तीपेक्षा वेगळा आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यामध्ये 24 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 2 मेगपिक्सल डेप्थ सेंसर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

इंटरनल मेमरी 128 जीबी असलेल्या या स्मार्टफोनची मेमरी मायक्रो एसडीकार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे, तसंच फेस अनलॉक हे फीचर देखील फोनमध्ये देण्यात आलं आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी 2.0, 4G VoLTE, Wi-Fi, ब्ल्यू-टुथ आणि जीपीएसचा सपोर्ट आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor 20 lite launched