दूध हे कॅल्शियम, जीवनसत्व डी आणि पोटॅशियमचे आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे असणारे स्त्रोत मानले जाते. पण नक्की गरम दूध प्यावे की थंड ? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काहींना गरम दूध आवडते तर काहींना थंड. खरतर दोन्ही प्रकारच्या दुधाचे फायदे आणि तोटे असतात. हे फायदे तोटे कोणत्या प्रकारचा महिना सुरु आहे त्यावर अवलंबून असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज १ ग्लास तरी दूध पिणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरम की थंड दूध ?

दूध हे एक पौष्टिक पेय आहे. जे शरीराच्या आवश्यकतेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करते. त्याचे बरेच फायदे आहेत. काही लोकांना ते थंड प्यायला आवडते तर काहींना ते गरम आवडते.
उन्हाळ्याच्या दिवसा थंड दूध पिणे अधिक फायदेशीर आहे. त्याच्या सेवनामुळे शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते. आणि शरीराला थंडावा जाणवतो. हिवाळ्यात रात्री दूध प्यायचे असेल तर आपण गरम दूधाचे सेवन करू शकता. गरम दूध शरीर उबदार ठेवते आणि थंडीपासून वाचण्यासाठी मदत करते.

गरम दुधाचे फायदे

गरम दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण ते सहज पचण्याजोगे असते. गॅस, जुलाब यासारख्या पचनाशी संबंधित समस्या गरम दुधाचे सेवन केल्याने टाळता येऊ शकतात. गरम किंवा कोमट दूधाने शांत झोप लागण्यासही मदत होते.

थंड दुधाचे फायदे

थंड दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे थंड दूध प्यायल्याने पित्तापासून आराम मिळतो. इतकेच नाही तर त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असल्याने थंड दूध दिवसभर शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. थंड दूध नैसर्गिक क्लीन्झर म्हणून देखील ओळखले जाते. थंड दूध सकाळच्या वेळी घेण टाळा. यामुळे पाचनाच्या समस्यांना प्रोत्साहन मिळते. तसेच खोकला, सर्दी यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

दुधाविषयीचे गैरसमज

काही लोक दुधाला वजन वाढण्याचे कारण मानतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. दुधात आढळणारे कॅल्शियम मेटापॉलिझम वाढवते ज्यामुळे शरीरात कॅलरी लवकर बर्न होतात. एवढेच नाही तर थंड दूध प्यायल्याने पोट बर्‍याच वेळ भरलेले राहते.