सध्या प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे झाले आहे. म्हाला तुमचे वजन वाढण्याची चिंता सतावत आहे का? नुसती काळजी करू नका त्याऐवजी यावर उपाय आहे याचा विचार करा. तुम्हाला जर खरोखर वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता तेही जीमला न जाता. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीमला जाण्याची आवश्यकता नाही. रोजच्या धावपळीत तुम्हाला जीमला जायला वेळ मिळत नसेल तर चिंता करू नका. 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बरेचसे लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. एकाच जागी तासनतास बसून काम करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा वाईट सवयी लोकांना लागल्या आहेत. यामुळे एकूण वजनाशी संबंधित समस्या वाढल्याचे लक्षात येते. भारतामध्ये असंख्य लोक स्थूलपणाचा सामना करत आहेत. वजन कमी व्हावे म्हणून अनेक उपाय करत आहेत. व्यायामाशिवाय वजन कमी करता येईल का हा प्रश्न सर्वाना पडतो. व्यायामाशिवाय वजन कमी होणे तसे अशक्य असते. योग्य व्यायाम आणि योग्य आहार घेतला तर वजन झपाट्याने कमी होऊ शकते. मात्र व्यायामाशिवाय वजन कमी करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.

what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
Karwa Chauth Fasting what to eat during fasting pre and post fasting for Karwa Chauth 2024
करवा चौथचा उपवास करताय? काय खावं काय खाऊ नये हे कळत नाहीय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
chillies for gut health
मिरची देठासह खावी की देठाशिवाय? तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी कोणती पद्धत आहे योग्य? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
treatments for arthritis, arthritis, Health Special,
Health Special : आर्थरायटिसवर काय उपचार असतात?
School students bag, School students,
दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्केपेक्षा जास्त नको…

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: बहिणीसाठी घ्या एकापेक्षा एक बजेट फ्रेंडली गिफ्ट्स, एकदा पाहाच

व्यायामाशिवाय वजन कसे कमी करावे ?

गरम पाणी

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसभर कोमट पाणी पिण्याची गरज नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी गरम पाणी पिण्याची गरज असते. विशेषतः जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आणि काहीही खाल्ल्यानंतर २० मिनिटानंतर कोमट पाणि प्यायल्याने वजन कमी होण्यास सुरुवात होते.

साखर कमी खावी

गोड खाल्ल्याने वजन वाढते. अति गोडाचे सेवन केल्यास व त्यामुळे जास्तच वजन वाढल्यास काही आजार जवळ येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ – मधुमेह. तुम्हाला व्यायामाशिवाय वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारामध्ये साखर हा पदार्थच काढून टाका. तसे पूर्णपणे शक्य नसल्यास साखरेचा वापर जितका कमी करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करावा. साखरेचे प्रमाण कमी असल्याचं तुमचे फॅट बर्न होते व वजन कमी होण्यास मदत होते.

चालणे

प्रत्येकाला आपल्या कामामुळे किंवा रोजच्या धावपळीमुळे व्यायामाला वेळ देणे शक्य होत नाही. व्यायामाशिवाय तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रोज चालणे हा उपाय करू शकता. जेवल्यानंतर रोज २० मिनिटे चालावे. दिवसा वेळ मिळत नसल्यास रात्री चालावे. जेणेकरून वजन कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा : Health Tips: वजन कमी करण्यासाठी ‘या’ प्रकारे करा दालचिनीचा वापर, पोट कमी होण्यास होईल मदत

फायबरचे सेवन

व्यायामाशिवाय वजन कमी करण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. फायबरच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेलं वाटतं आणि त्यामुळे अन्न सेवन कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. पेरू, बीन्स, तृणधान्ये, सफरचंद आणि केळी हे फायबरचे चांगले स्रोत आहेत.

पुरेशी झोप घ्या

कधीकधी पुरेशी झोप न मिल्ने हे देखील वजन वाढण्याचे कारण ठरू शकते. वजन वाढू नये यासाठी तुम्हाला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. तुमचा आहार सकस असणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)