Hotel Guests leave Behind the Most Unusual Things : हॉटेलमध्ये काम करणे ही साधारण गोष्ट नाही. हॉटेलचे कर्मचारी दररोज नवनवीन लोकांचे पाहुणे म्हणून स्वागत करतात, त्यांचे आदरातिथ्य करतात; त्यांना काय हवं आणि काय नको याची काळजी घेतात. त्यांना स्वच्छ सुंदर अशी खोली राहायला दिली जाते, पण जेव्हा ते खोली सोडतात तेव्हा असे निदर्शनास आले आहे की, ते त्यांचे सामान खोलीमध्ये विसरतात.
Hotels.com च्या एका नवीन अहवालानुसार, लोक सहसा खोली सोडताना मोबाइल चार्जर, ॲडॉप्टर विसरतात; पण त्याबरोबरच अस्वच्छ कपडे, लक्झरी बॅग, घड्याळ आणि एवढंच काय तर पाळीव पालसुद्धा ते खोलीमध्ये विसरतात. (Hotel Guests leave Behind the Most Unusual and unexpected Items during travelling)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत Hotels.com च्या ग्लोबल पब्लिक रिलेशनच्या उपाध्यक्षा मेलेनिया फिश (Melanie Fish) सांगतात, “Hotels.com वर आम्हाला हॉटेल आतून आणि बाहेरून माहीत असते.” या अहवालात पुढे सांगितले आहे की, हॉटेल्सनी काही अशा गोष्टी समोर आणल्या आहेत, ज्या जगभरातील ४०० हून अधिक हॉटेल्समधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर आहेत.

हेही वाचा : PresVu Eye Drop : चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित; कारण काय

सहसा लोक हॉटेल्समध्ये रोलेक्स घड्याळ, हर्मीस बिर्किन बॅग विसरतात; पण त्याबरोबर बांधकामादरम्यान वापरले जाणारे पाईप्स, कार टायर, पैसे आणि अगदी पाळीव पालसुद्धा विसरतात. पण, नंतर मालकांबरोबर संपर्क साधून पाळीव प्राणी परत केले जातात.

विसरण्याची ही यादी संपत नाही. या अहवालात पुढे सांगितल्याप्रमाणे, जेव्हा लोक खोली आपल्या नावे नोंद करतात, त्या कालावधीत ते अनेक वस्तू मागवतात. केळी, तुटलेला अंघोळीचा टब, जळालेला टोस्ट, हॉट डॉग, पाळीव प्राण्यांसाठी मागवलेले अन्न, शेळीचे अन्न हे लोक तसेच खोलीमध्ये सोडून जातात.

हेही वाचा : kitchen Jugaad : स्वयंपाकघरात पालींचा सुळसुळाट झालाय? वापरून पाहा ‘या’ सहा सोप्या ट्रिक्स; पाल काय झुरळ, किडेपण जातील पळून

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना त्यांच्या वस्तू कशा परत केल्या आहेत हे या अहवालात सांगितले आहे. एकाला विसरलेला पासपोर्ट परत करण्यासाठी त्यांना १०० मैल जावे लागले, तर दुसरा हॉटेल कर्मचारी क्रूझ जहाज सुटण्यापूर्वी वस्तू परत करण्यासाठी शंभरहून अधिक मीटरपर्यंत त्याच्या मागे गेला होता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotel guests leave behind the most unusual and unexpected items during travelling ndj