जीवनसाथी शोधण्यासाठी देशभरात ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइटचे चलन वाढत आहे. अलिकडेच ‘शादी डॉट कॉम’ने खुलासा केला की, त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून २० लाखापेक्षा जास्त तरुण लग्नबंधनात बांधले गेले असून, तीन कोटींपेक्षा जास्त जण या साइटवरून जीवनसाथीचा शोध घेत आहेत. असे असले तरी, अशाप्रकारच्या वेबसाइटच्या माध्यमातून चांगले स्थळ मिळत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. सात जन्माचा साथीदार मिळवताना चांगल्या आणि आकर्षक प्रोफाईलची मदत होऊ शकत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. तर, जाणून घेऊ या! मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर आकर्षक प्रोफाइल बनविण्याच्या टिप्स. प्रोफाइल बनवताना सर्वात जास्त लक्ष तुमच्या छायाचित्रावर द्या. सर्वात अलिकडचे फोटो प्रोफाइलवर ठेवा. हे फोटो मोबाईलच्या कॅमेऱ्याने अथवा साध्या कॅमेऱ्याने काढलेले असावेत. स्टुडिओमध्ये काढण्यात आलेले फोटो प्रोफाइलवर ठेऊ नका. फोटोमध्ये केवळ तुम्हीच दिसाल याची दक्षता घ्या. अन्य कोणाबरोबरचा फोटो प्रोफाइलवर टाकू नका. तुम्हाला जे कपडे चांगले दिसतात असेच कपडे फोटो काढताना परिधान करा. जर का तुम्ही खेळाडू अथवा एखादे वाद्य वाजविण्यात माहिर असाल तर तशाप्रकारच्या फोटोचा वापर करू शकता. तुमच्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल, तर त्याच्यासोबतच्या छायाचित्राचादेखील वापर करू शकता. प्रोफाइलमधील सर्व रकाने भरलेले असावेत. परंतु, सर्व माहिती संक्षिप्त स्वरुपात आणि नेमकेपणाने नोंदवलेली असावी. अधिक तपशिलात जाण्याचे टाळा. स्वत:बद्दल बढाईखोरपणे लिहू नका, खास करून तुमचे रंगरूप आणि शारिरीक बांध्याविषयी लिहितान असे करायचे टाळा. लिहिताना व्याकरणाच्या चुका टाळा. एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसल्यास त्याचा वापर करू नका. एकदा प्रोफाईल तयार केल्यावर न विसरता नियमितपणे तुमच्या खात्याला भेट द्या. एखादी रिक्वेस्ट आल्यास प्रतिसाद देण्यास जास्त उशीर लावू नका किंवा एखाद्या रिक्वेस्टमध्ये वाजविपेक्षा जास्त उत्साह दाखवू नका. अनावश्यक आततायीपणा टाळा.
(छाया सौजन्य : थिंकस्टोक इमेज)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा