Expired Condoms in Marathi: पुरुष आणि महिलांनी कंडोमचा वापर करणे हा गर्भधारणा टाळण्यासाठी एक सामान्य मार्ग आहे. लैंगिक आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. फॅमिली प्लानिंसाठी कंडोमचा वापर केला जातो. गर्भधारणा टाळण्यासाठी देखील कंडोमचा वापर केला जातो. तज्ज्ञ सांगतात, असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यात कंडोमने मोठी भूमिका बजावली आहे. पण कंडोम कालबाह्य होतात का? कंडोमची एक्सपायरी डेट असते तर मग कंडोम एक्सपायर झाला की नाही हे कसं ओळखाल? चला तर जाणून घेऊया.
कंडोम एक्सपायर होतात का?
खरंतर, अन्य औषधांप्रमाणे कंडोमही एक्सपायर होतो. कंडोमचीही एक्सपायर डेट असते. कंडोमच्या पाकिटावर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. अशा स्थितीत जेव्हाही तुम्ही कंडोम खरेदी करताय तेव्हा त्याची एक्सपायरी डेट तपासणे फार गरजेचे आहे. साधारणतः एका कंडोमची एक्स्पायरी डेट कालावधी हा एक वर्षांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे तुम्ही किमान एक वर्ष हे वापरू शकता. पण तरीही कंडोम जास्त ठेवून वापरू नये.
(हे ही वाचा : कोणती आसन स्नायू बळकट अन् झपाट्याने वजन कमी करण्यास मदत करू शकतात? योग तज्ज्ञांनी दिलं उत्तर… )
एक्सपायरी डेट संपलेले कंडोम कसे ओळखाल?
लैंगिक आजारांपासून संरक्षण व्हावं, यासाठी आणि अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो. अनेकदा अति उत्साहामुळे अनेक जोडप्यांकडून सेक्स पूर्वी कंडोमची एक्सपायरी डेट पाहणे राहून जाते. ज्याचे सेक्सदरम्यान वा सेक्स नंतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. खरंतर, कंडोम एक्सपायर होऊन बरेच दिवस उलटले असतील तर त्याचा वापर करू नये. कारण, यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारे संरक्षण मिळणार नाही.
१. कंडोमचा पॅकेट उघडताना कात्री वापरू नका. तसेच, तुम्ही तुमच्या नखांनी किंवा कारच्या चाव्याने चुकूनही ते टोचणार नाही याची खात्री करा. कारण अशा गोष्टींमुळे डॅमेज झालेला कंडोम घातक ठरु शकतं.
२. कंडोम मधून दुर्गंधी येत असेल तर कंडोम एक्सपायर झालेला असू शकतो. म्हणून असा कंडोम वापरणे शक्यतो टाळावे.
३. कंडोम फार जास्त ड्राय, चिकट वाटत असेल तर तो कंडोम वापरु नका.
४. कंडोमची एक्स्पायरी डेट नक्की तपासा. कंडोमची एक्स्पायरी डेट संपली असेल तर त्याचा वापर करू नका.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून ‘लोकसत्ता’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)