चालणे हा सर्वात सोपा आणि उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे शरीर फिट राहण्याबरोबरच आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चालल्यामुळे कॅलरी बर्न होऊन, वजन कमी होण्यास मदत मिळते. ज्यांना कठीण व्यायाम करणे शक्य नाही किंवा त्यासाठी वेगळा वेळ काढता येत नाही अशा व्यक्ती रोजच्या व्यायामात चालण्याचा समावेश करू शकतात. हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी दररोज चालणे फायदेशीर ठरू शकते. तसेच चालल्यामुळे अपचनाची समस्या देखील कमी होते. पण रोजच्या व्यस्त शेड्युलमध्ये चालण्यासाठी वेगळा वेळ काढणे कठीण जाते, यासाठी तुम्हाला काही सवयी मदत करतील. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंच ब्रेक
साधारणपणे ३० ते ४५ मिनिटांचा लंच ब्रेक सर्वांना मिळतो. या वेळेमध्ये डेस्कवरच जेवण न करता, कॅन्टीन किंवा इतर ठिकाणी जेवण करण्यासाठी जा, त्यामुळे शरीराची हालचाल होईल. तसेच जेवण झाल्यानंतर शक्य तितका वेळ चाला, कारण बैठी कामाचे स्वरूप असल्याने चालण्याची संधी दिवसभरात कमी मिळते.

पायऱ्यांचा वापर करा
दिवसातून शक्य तितक्या वेळा लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे शरीराची हालचाल होण्याबरोबर चालण्याची संधी मिळेल.

आणखी वाचा : चालत राहा! दररोज चालणे शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या

फोनवर बोलत असताना चाला
दिवसभरातला काही वेळ आपण फोनवर बोलण्यात व्यस्त असतो, अशावेळी तुम्ही फोनवर बोलता बोलता चालू शकता, यामुळे तुमचे दिवसाचे चालण्याचे टार्गेट पूर्ण करण्यास मदत होईल. तसेच ओव्हनमध्ये किंवा गॅसवर काही पदार्थ गरम करण्यासाठी ठेवला असेल तर अशावेळी एका ठिकाणी उभे राहून वाट बघण्यापेक्षा तेवढा वेळ तुम्ही चालू शकता.

रिमाइंडर सेट करा
जर कामाच्या गडबडीमध्ये चालणे राहून जात असेल, तर यासाठी फोनमध्ये रिमाइंनडर सेट करू शकता. यामुळे रोज वेळेवर याची आठवण करुन देण्यात येईल.

मित्राला सोबत येण्याची विनंती करा
आपल्याला जास्त चालायची सवय नसते. त्यामुळे काही तुमच्या सवयीचा भाग होईपर्यंत चालणे अत्यंत कंटाळवाणे वाटू शकते, त्यात तुम्ही मध्येच चालणे सोडू देखील शकता. त्यामुळे काही दिवस हे तुमच्या रुटिनचा भाग होईपर्यंत मित्राला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्या बरोबर येण्याची विनंती करा, यामुळे तुम्हाला चालणे कंटाळवाणे वाटणार नाही. जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याला बरोबर घेऊनही तुम्ही चालायला जाऊ शकता.