Cashews Making Process : अनेक भारतीय खाद्यपदार्थांच्या ग्रेव्हीमध्ये आढळणारा सर्वांच्या आवडत्या ड्रायफ्रुट्सपैकी एक पदार्थ म्हणजे काजू. त्याची एक खास गोष्ट म्हणजे ते वर्षभर उपलब्ध असतात, जर तुम्ही ते व्यवस्थित साठवले तर त्याची शेल्फ लाइफ खूप चांगली असते. काजू झाडांवर वाढतात. त्याचे फळ झाडाच्या फांद्यांच्या खाली लटकलेल्या मोठ्या रसाळ सफरचंदांसारखे दिसतात हे अनेकांना माहीत नसेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे झाडावरील फळापासून बाजारातील काजू बाहेर कसे येतात? याबाबत माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, त्यात काजूवर प्रक्रिया केली जात आहे. ही क्लिप ‘_heresmyfood’ या इंस्टाग्राम पेजने पोस्ट केली आहे, ज्यामध्ये फळांमधून काजू कसा काढला जातो याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे.
हेही वाचा – एका दिवसात किती द्राक्ष खावे? मधुमेही व्यक्तींनी कसे करावे सेवन? जाणून घ्या
काजू तयार करण्याची प्रक्रिया
सर्वात आधी दोन ते तीन दिवस एका मोकळ्या जागेत काजू उन्हात वाळवले जातात. त्यानंतर काजूंना नियमित स्वरुपात वरखाली केले जाते जेणेकरून हे कडक होतील आणि समान स्वरुपात सुकले जातील. ही प्रक्रिया त्यातील जास्तीचा ओलावा काढून टाकते. त्यानंतर काजूला भाजले जाते आणि त्याच्या फळाचे बाहेर आवरण तोडून आतून काजू बाहेर काढला जातो. त्यानंतर त्याचे गुणवत्ता तपासली जाते. काही महिला काजू वेगळे करायला बसतात आणि हाताने ड्रायफ्रुट्स उघडतात.
हेही वाचा – बहुतांश भारतीय कोलेस्ट्रॉल, डायबेटीजसह ‘या’ आजारांनी आहेत ग्रस्त; ICMRच्या अभ्यासामध्ये मोठा खुलासा
सोलण्याची प्रक्रिया म्हणजे काजूवर चिकलेली टेस्टा (बाह्य त्वचा) काढून टाकणे, त्यानंतर ते कंप्रेस्ड एयरवेने घासले जातात. यानंतर शेवटचा टप्पा येतो, ज्यामध्ये महिला काजमधूनअशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी बसतात. त्यानंतर काजूला ओवनमध्ये ७० डीग्री सेल्सियस आणि व्होइलामध्ये भाजले जाते. बास तुमचे काजू बाजारात विकण्यासाठी तयार आहेत.