देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रदूषणाचा सामना करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. प्लास्टिक हा आपल्या देशातील कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात दरवर्षी सुमारे १४ मिलियन टन प्लास्टिकचा वापर होत असल्याचा अंदाज आहे. प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. प्लॅस्टिकचा वापर आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेक तज्ज्ञांनी असं म्हटलंय की प्लास्टिक हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या आरोग्यावर परिणाम करतो. प्लास्टिकचे विघटन सहज होत नाही आणि त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि मातीचे प्रदूषण होते. तसेच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक समुद्रात पोहोचते आणि समुद्रातील प्राणी ते प्लास्टिक गिळतात. समुद्रातून काढलेले मासे आणि इतर सीफूड खाल्ल्याने प्लास्टिकचे तुकडे माणसाच्या पोटात पोहोचतात आणि आतड्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात.
Monsoon Health Tips : पावसाळ्यात मांसाहारापासून राहा लांब; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम
अनेकवेळा अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केलिकल्स वापरले जातात. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. आपण प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक केलेले अन्न खाणे टाळले पाहिजे. तसेच, पाणी पिण्यासाठी तांबे, स्टील किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर केला पाहिजे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण प्लास्टिकचा कमीत कमी वापर करायला हवा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची गंभीर हानी होत असून त्याचा फटका आपल्यालाच सहन करावा लागत आहे. प्लास्टिकचा वापर बंद केला तर पर्यावरणातील अनेक प्रकारचे प्रदूषण कमी होऊन ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.