Jingle Bell Song Meaning: ‘ख्रिसमस’ हा शब्द ऐकताच शुभ्र पांढरी दाढी, जाड चष्मा आणि लाल-पांढरे कपडे घातलेल्या सांताक्लॉज लोकांच्या मनात दिसू लागतो. यासोबतच ‘जिंगल बेल्स’ गाण्याची धूनही मनात येते. एवढेच नाही तर २५ डिसेंबरला ‘जिंगल बेल्स’ हे गाणे बाजारापासून ते गिफ्ट शॉप्सपर्यंत आणि अगदी ख्रिसमसच्या पार्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी सर्वाधिक वाजवले जाणारे गाणे झाले आहे. सगळीकडे लोक हे गाणे गुणगुणताना, त्यावर नाचताना दिसतात, पण हे जिंगल बेल गाणे सांताक्लॉज आणि ख्रिसमसची ओळख कधी बनले आणि या गाण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
जिंगल बेल गाणे इतके प्रसिद्ध कसा झाला?
ख्रिसमसच्या निमित्ताने जे गाणे प्रत्येक पार्टीची शोभा वाढवते, त्याचा नाताळशी काही संबंध नाही, ना या गाण्यात कुठेही ख्रिसमसचा उल्लेख नाही. याशिवाय, जिंगल बेल्स हे थँक्सगिव्हिंग गाणे आहे, जे १८५० मध्ये जेम्स पियरपॉन्ट नावाच्या संगीत दिग्दर्शकाने लिहिले होते आणि हे गाणे १८५७ मध्ये पहिल्यांदा सामान्य प्रेक्षकांसमोर गायले गेले होते.
एवढेच नाही तर या गाण्याचे मूळ नावही जिंगल बेल नाही. जेम्स पिअरपॉन्टने या गाण्याचे नाव ‘वन हॉर्सओपन स्लेई’ ठेवले आणि सुरुवातीला ते या नावाने ओळखले जात असे. पुढे, १८९० पासून, हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आणि या काळात हे गाणे ख्रिसमस गाणे म्हणून गायले जाऊ लागले.
जिंगल बेल्सचा अर्थ काय आहे?
जिंगल बेल्स या शब्दाचा काही विशेष अर्थ नाही. याशिवाय, जेम्स पिअरपॉंटचे गाणे जेव्हा हळूहळू ख्रिसमस पार्टीची शोभा वाढवू लागले आणि गाण्यात ख्रिसमसचा उल्लेख नसतानाही, या गाण्याशिवाय हा उत्सव अपूर्ण वाटू लागला तेव्हा त्याचे नाव बदलून ‘वन हॉर्स ओपन स्लीह’ वरून जिंगल बेल्स करण्यात आले. प्रत्यक्षाच सांताक्लॉजच्या हातातील घंटा त्याच्या आगमनाची माहिती देते, म्हणूनच हे गाणे ख्रिसमसशी संबंधित असल्याने त्याला जिंगल बेल्स असे टायटल दिले गेले.
हेही वाचा – ‘घरघंटी किणकिणती घंटा…सांताक्लॉज आला…”; मराठी ‘जिंगल बेल’ गाणं ऐकलं का? नाही मग ‘हा’ व्हिडीओ बघाच!
आज जिंगल बेल गाण्याच्या अनेक आवृत्त्या तयार झाल्या आहेत. तसेच, त्यांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेकदा वापरल्या गेल्या आहेत.
गाण्याचे बोल
डॅशिंग थ्रू द स्नो
इन अ वन हॉर्सओपन स्लेई,
ओ द फ़ील्ड्स वी गो
लाफिंग ऑल द वे
बेल्स ऑन बॉब टेल्स रिंग
मेकिंग स्पिरिट्स ब्राइट
वॉट फन इट इस टू लाफ अँड सिंग
अ स्लायिंग सोंग टूनाईट
ओ, जिंगल बेल्स, जिंगल बेल्स
जिंगल ऑल द वे
ओ वॉट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई
ओ, जिंगल बेल्स, जिंगल बेल्स
जिंगल ऑल द वे
ओ वॉट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई
अ डे ऑर टू अॅगो
आय थॉट आय टेक अ राइड
अँड सून मिस फनी ब्राइट
वॉज सीटेड बाय माय साइड
द हॉर्स वॉज लीन अँड लँक
मिस्फोरच्यून सीम्ड हिज लॉट
वी गोट इनटू अ ड्रिफटीड बैंक
अँड देन वी गॉट अप्सॉट
ओ, जिंगल बेल्स, जिंगल बेल्स
जिंगल ऑल द वे
ओ वॉट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई
ओ, जिंगल बेल्स, जिंगल बेल्स
जिंगल ऑल द वे
ओ ऑट फन इट इस टू राइड
इन अ वन हॉर्सओपन स्लेई।
हेही वाचा – इथं ‘तो’, तिथं ‘ती’, दोघांच्याही वेगवेगळ्या विमानाचा एकाच दिवशी झाला अपघात; पण नंतर जो चमत्कार घडला…
नुकतेच सोशल मीडियावर या गाण्याचे मराठी आवृत्ती देखील व्हायरल झाली.