स्वयंपाक करताना स्वयंपाकघराची स्वच्छता ही देखील अत्यंत महत्त्वाची असते. स्वयंपाक घरातील प्रत्येक भांडे स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे वरच्यावर स्वयंपाक घरातील भांड्याची साफ सफाई केली पाहिजे. गृहिणी अनेकदा सणासुदीच्या आधी स्वयंपाकघर आणि स्वयंपाकाची सर्व भांडी साफ करतात. स्वयंपाकाची भांडी साफ करणे तसे फार अवघड काम नाही पण आजकाल स्वयंपाकघरात विविध प्रकारची भांडी वापरली जातात त्यांची योग्य पद्धतीने साफसफाई करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

आजकाल स्वयंपाक करताना नॉनस्टिक भांड्यासाठी लाकडी चमचे वापरले जातात जेणेकरून भांडे खराब होऊ नये पण या लाकडी चमचे अथवा पळी कशी साफ करावी हे अनेकांना माहित नसते. चुकीच्या पद्धतीने त्यांची सफाई केल्यास त्याची चमक जाऊ शकते. तसेच अनेकदा चमच्यांचा वास देखील जात नाही पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्यामदतीने तुम्ही लाकडी चमचे आणि पळी झटक्यात करू शकता साफ. चला तर मग जाणून घेऊ…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – तुमच्या वाईट सवयी कमी करतात तुमचा आत्मविश्वास; जाणून घ्या कसा वाढवावा स्वत:वरील विश्वास

कसे साफ करावे लाकडी चमचे किंवा पळी

लाकडी चमचे किंवा पळी साफा करण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरातील उपलब्ध असलेले सामन वापरू शकता. तुम्हाला फक्त मीठ लिंबू आणि तेल हवे आहे. तुम्ही लिंबू , मीठ आणि तेल वापरून झटपट लाकडी चमचे साफ करू शकता. व्हायरल व्हिडीओमध्ये ही सोपी ट्रिक सांगितली आहे.

व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, एटा वाटीत मीठ घेतलेले आहे. त्यात अर्धे चिरलेले लिंबू बुडवून चमच्याला सर्व बाजूने चोळावे जेणकरून त्याचा वास निघून जाईल त्यानतंर पाण्याखाली धूऊन घ्यावे आणि एका कापडाने चमचे पुसून घ्यावे. त्यानंतर त्याला तेल लावावे म्हणजे ते चमचे नव्यासारखे चमकतील.

हेही वाचा – मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कधीही पुन्हा गरम करू नये ‘हे’ पदार्थ

इंस्टाग्रामवर priya_dwarke या अकांउटवर लाकडी चमचे कसे साफ करावे याची ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक काम करते की नाही हे स्वत: वापरून पाहा.

Story img Loader