आहार तज्ञ हे आपल्याला नेहमी आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस करत असतात. याचे कारण असे की भाज्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. भाज्या फक्त तुमचे पोट भरत नाहीत तर त्यांच्या स्वादिष्ट चवीने हृदयाला देखील प्रसन्न करतात. अशीच एक भाजी म्हणजे कोबी, जी अनेक रंग आणि आकारात येते. या भाजीचे जगभर विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो. कोबी स्वादिष्ट आहे आणि अनेक शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत करू शकते. तरी काही लोकं कोबी खाण्यास टाळाटाळ आणि भिती का वाटते जाणून घेऊयात…..
कोबी आरोग्यासाठी कशी चांगली आहे?
कोबीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे कोबी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. तुम्ही जर कोबीचे सेवन नियमित केले तर कोबीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कोबीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोन्यूट्रिएंट्ससारखे गुणधर्म देखील आहेत. या भाजीमध्ये फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात. पण तरीही लोकं कोबी खाण्यास का घाबरतात?
लोक कोबी खाण्यास का घाबरतात?
बर्याचदा तुम्ही बाहेर बर्गर, चाऊ मीन, मोमोज, स्प्रिंग रोल खाताना इत्यादींमधून कोबी काढायला सांगतात. त्यात अशी काही लोकं असतात जी कोबीच्या नावाने घाबरतात. खरं तर कोबीच्या माध्यमातून शरीरात टेपवर्म पोहोचण्याची अनेक कारणे आहेत. आतड्यांमध्ये विकसित झाल्यानंतर हे रक्ताच्या प्रवाहा बरोबर तुमच्या शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतात. कधी डोळ्यात, कधी मेंदूत अशा परिस्थितीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
कोबीबद्दल अशा कारणाने अनेक लोकांच्या मनात भीती निर्माण झाले आहे की, त्यात उपस्थित किडा जो कोबी खाऊन शरीरापर्यंत पोहचतो आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. जर ते मेंदूपर्यंत पोहोचले तर ते घातक ठरू शकते. या अळीला टेपवर्म असे म्हणतात. याच कारणाने अनेक लोकं कोबीचे प्रकार किंवा पदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात.