Right way of egg boiling: हिवाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अनेक जण अंड्यांचे सेवन करतात. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा नाश्ता, अनेकांच्या आहारात अंड्याचा समावेश असतो. ज्यात अनेक जण उकडलेली अंडी खाणं पसंत करतात. पण, अंडी उकडायला खूप वेळ लागतो. शिवाय गडबडीत अंडी व्यवस्थित उकडली जात नाहीत. अशा परिस्थितीत अंडी उकळताना तुम्हाला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही ३- ३- ३ पद्धतीची मदत घेऊ शकता, ज्याद्वारे तुम्ही अंडी उकळू शकता आणि ती योग्य प्रकारे खाऊ शकता.
अंड्यांसाठी ३-३-३ पद्धत काय आहे?
ही पद्धत अंडी उकडवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यानुसार, अंडी प्रेशर कुकरमध्ये ३ मिनिटे शिजवा. ३ मिनिटे असेच बाहेर ठेवा आणि नंतर अंडी बर्फाच्या पाण्यात टाका. त्यानंतर ३ मिनिटांनी अंडी सोलून घ्या. अशाप्रकारे अंडी व्यवस्थित उकडली जातील.
उकळत्या पाण्यात अंडी किती वेळ उकळायची?
- अंड्यातील पिवळा बलक आणि मऊ पांढरा भाग मिळविण्यासाठी अंडी सहा मिनिटे उकळणे आवश्यक आहे.
- टोस्ट किंवा सॅलेडबरोबर खाल्ली जाणारी अंडी आठ मिनिटे उकळवा.
- १०-१२ मिनिटे उकडलेल्या अंड्यांपासून तुम्ही अंडा करी बनवू शकता.
अंडी उकळण्याची उत्तम पद्धत
हेही वाचा: बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
अंडी उकळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते पॅनमध्ये ठेवा आणि नंतर पांढरे व्हिनेगर घालून ५ ते ८ मिनिटे शिजवा. तुम्ही अंडी शिजवत असताना जर त्याचे वरचे कवच फुटू लागले तर समजून घ्या की अंडी तयार आहेत. यानंतर अंडी फोडून सोलून खा. असे केल्याने अंडी उत्तम प्रकारे तयार होतात.