How Long You Can Keep Boiled Egg: थंड वातावरणात निरोगी राहण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्तीसह शरीर आतून उबदार असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सध्या लोकांनी न्याहारीमध्ये अंड्यांना प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे. अंड्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात, त्यामुळे याला सुपरफूड असेही म्हणतात. अंड्याचे सेवन हिवाळ्यात तुमच्यासाठी औषधाचे काम करू शकते. तुम्हीही जर उकडलेली अंडी दररोज खात असाल तर, अंड उकडल्यानंतर किती वेळात खाल्लं पाहिजे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उकडलेले अंडे खाण्याचे अनेक फायदे आहेत

अंड हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यात अनेक पोषकतत्त्वे असतात. त्याचबरोबर शरीराला उर्जाही मिळते. अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन A, B6, B12, फोलेट, एमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनियम आणि आवश्यक प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यात उकडलेल अंड हे प्रथिने आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. नाश्त्यापासून स्नॅक्सपर्यंत अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

अंड उकडल्यानंतर किती वेळात खाल्लं पाहिजे

अंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवली जातात. आता प्रश्न असा येतो की उकडलेले अंडे किती वेळात खाल्लं पाहिजे? जास्त उकडलेली अंडी तुम्ही ५ ते ७ दिवसांपर्यंत ठेऊ शकता आणि जर तुम्ही अंडी कमी उकडलीत, तर त्याला २ दिवसांच्या आत खावे लागेल. जर अंड उकडताना त्याचे कवच तुटले तर अशी अंडी २ ते ३ दिवसांच्या आत खावी.

हेही वाचा >> डोळ्यांचे आजार, मोतीबिंदूसाठी उपयोगी ठरतील ‘हे’ पाच सुपर फूड्स; काय आहे डॉक्टरांचा सल्ला, घ्या जाणून…

अंडी फ्रीजमध्ये ठेवणे महत्वाचे

जेव्हा आपण उकडलेले अंडी बर्‍याच काळासाठी ठेऊन देता, तेव्हा त्यांचे पीएच बदलते आणि यामुळे वास येऊ लागतो. अंडी उकडल्यानंतर लगेचच त्यांना थंड पाण्यात ठेवा. जेव्हा अंडी थंड होतात, त्यांना स्वच्छ कपड्याने पुसा, वाळवा आणि ताबडतोब रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. असे केल्याने बॅक्टेरिया आणि इतर संक्रमण अंड्यात येऊ शकणार नाहीत. अंडी थंड झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर फ्रीजमध्ये ठेवा. जर अंडी त्वरित फ्रीजमध्ये ठेवली गेली नाहीत, तर ते खाणे धोकादायक ठरू शकते. कारण जास्त तापमान अंड्यांमधील साल्मोनेला सारख्या जीवाणूंसाठी असुरक्षित बनवते. बाहेर ठेवलेली अंडी २ तास किंवा त्याहून अधिक काळ ठेवू नका. जेव्हा अंडी खायची असतील तर त्याला खाण्यापूर्वी फ्रिजमधून बाहेर काढा. जर अंडी २ तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवलेली असतील तर आपण ती खाऊ नये.

(सूचना: कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How long you can keep boiled egg know how many hours after boiling eggs should be eaten srk
Show comments