आपल्याला जर निरोगी आणि चांगले आरोग्य हवे असेल तर त्यासाठी नियमित आठ तासांची झोप घेणं आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असल्याने, निद्रानाश ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. व्यक्तीच्या जीवनात असलेली चिंता, काळजी आणि मानसिक तणावाचा परिणाम झोपेवर होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला रात्री दररोज आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे.
कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी किती तासांची झोप आहे पुरेशी?
- ६ ते ९ वयोगटातील मुलांसाठी नऊ ते अकरा तासांची झोप आवश्यक आहे.
- १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी आठ ते दहा तासांची झोप आवश्यक आहे.
- १८ ते ६४ वयोगटातील व्यक्तींसाठी सात ते नऊ तास झोप गरजेची आहे.
- ६५ वर्षांवरील वृद्धांसाठी सात ते आठ तास झोप गरजेची आहे.
( हे ही वाचा: राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाल्याची भीती; जाणून घ्या व्यक्ती ब्रेन डेड होते म्हणजे नेमकं काय होतं?)
(इन्सोम्निया) निद्रानाशाचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टी पाळा
चहा आणि कॉफीचं सेवन
चहा आणि कॉफमध्ये कॅफिन हे उत्तेजक घटक असते. त्यामुळे तुमची झोप उडते. त्याचप्रमाणे कॅफिनच्या अतिसेवनाने सेवनाने रात्री वारंवार लघवी सुद्धा येऊ शकते आणि त्यामुळे तुमची झोपमोड सुद्धा होऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी जवळपास ४ ते ५ तास अगोदर चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये.
रात्री भरपूर खाऊ नये
रात्रीच्या जेवतेवेळी कमी जेवणे कधीही चांगले आहे. रात्री जेवताना हलका आहार घ्यावा तसंच मसालेदार पदार्थ किंवा जास्त तिखट खाणे टाळावे. कारण त्यामुळे तुम्हाला पित्त अपचनाचा त्रास उद्भवू शकतो आणि त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते. दिवसा तुम्ही जास्त खाल्लं तर चालेल मात्र रात्री थोडं कमी खात.
( हे ही वाचा: तुमची नखं लांब वाढलेली आहेत? तर वेळीच जाणून घ्या त्यामुळे होणारे धोकादायक आजार)
झोपण्यापूर्वी व्यायाम करू नका
काही लोकांना संध्याकाळी व्यायाम करण्याची सवय असते. मात्र, ही सवय तुमच्या निद्रानाशाचे कारण ठरू शकते. तसेच रात्री उशिरा व्यायाम करणे देखील आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे व्यायाम करताना दररोज सकाळी करत जा याने तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. जर तुम्हाला काही कारणास्तव सकाळी व्यायाम करणं जमत नसेल तर संध्याकाळी व्यायाम करतेवेळी रात्री झोपण्याच्या चार ते पाच तास आधी करावा. याने तुमच्या झोपेवर परिणाम होणार नाही.